बॉलिवूड आमची गाणी चोरतो, पाकिस्तानी अभिनेत्रीचा दावा

पाकिस्तानी अभिनेत्री महविश ह्यात हीने पुन्हा एकदा बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. भारत पाकिस्तानची गाणी चोरतो, असा आरोप पाकिस्तानची महविश ह्यातने केला आहे.

बॉलिवूड आमची गाणी चोरतो, पाकिस्तानी अभिनेत्रीचा दावा

इस्लामाबाद : पाकिस्तानी अभिनेत्री महविश हयात हीने पुन्हा एकदा बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. ‘भारत पाकिस्तानची गाणी चोरतो’, असा आरोप पाकिस्तानची महविश हयातने केला आहे. महविशच्या आरोपानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात तिला ट्रोल करण्यात आलं आहे. याशिवाय पाकिस्तानी युजर्सनेही तिला पाठिंबा दिला आहे.

“भारतीय अभिनेत्री आलिया भट्टचे एक गाणं ‘प्रादा’च्या संदर्भात तिनं म्हटलं आहे की, हे गाणं पाकिस्तानच्या व्हाईटल साईनचं गाणं ‘गोरे रंग’सोबत मिळते जुळते आहे”, असं महविश हयातने म्हटलं आहे.

“मला खूप आश्चर्य वाटत आहे. एकीकडे बॉलिवूड पाकिस्तानला खलनायक असल्याचे सांगते आणि दुसरीकडे आमची गाणी चोरते. तसेच कोणत्याही प्रकारची परवानगी, कॉपीराईट्स उल्लंघन आणि रॉयल्टी देत नाहीत”, असं महविश हयातने ट्वीट केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

महविशने अभिनेता शाहरुख खानच्या नेटफ्लिक्स शो ‘बॉर्ड ऑफ ब्लड’वरही टीका केली. महविश म्हणाली, “मी बऱ्याच दिवसांपासून सांगत आहे. अजून एक पाकिस्तान विरोधी प्रोजेक्ट बॉलिवूडने केला आहे. आता तरी आपण जागे होणार आणि समजून घेणार का? बॉलिवूडचा अजेंडा काय आहे? शाहरुख खान देशभक्त बना, कोण तुम्हाला यासाठी रोखणार नाही. पण आमची बदनामी करु नका”.

महविशने काही दिवसांपूर्वीच एका लेखात म्हटले होते की, “भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या देशातील चित्रपट उद्योगाला सशस्त्र केलं आहे. पाकिस्तान एक मुस्लीम देश आहे आणि येथे फिल्म उद्योगात इस्लामोफोबिया आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *