अजय देवगणच्या ‘तानाजी’मध्ये काजोलची एंट्री

मुंबई : बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण सध्या त्याच्या आगामी ‘तानाजी : द अनसंग वॉरीअर’ या सिनेमासाठी चर्चेत आहे. या सिनेमात तो एका मराठा योद्ध्याची भूमिका निभावतो आहे. तो मराठी योद्धा दुसरा कुणी नसून शिवरायांचा सिंह सुबेदार तानाजी मालुसरे आहे. अजय देवगण तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. पण या सिनेमात आणखी एक सप्राईज …

अजय देवगणच्या ‘तानाजी’मध्ये काजोलची एंट्री

मुंबई : बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण सध्या त्याच्या आगामी ‘तानाजी : द अनसंग वॉरीअर’ या सिनेमासाठी चर्चेत आहे. या सिनेमात तो एका मराठा योद्ध्याची भूमिका निभावतो आहे. तो मराठी योद्धा दुसरा कुणी नसून शिवरायांचा सिंह सुबेदार तानाजी मालुसरे आहे. अजय देवगण तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. पण या सिनेमात आणखी एक सप्राईज प्रेक्षकांना मिळणार आहे. या सिनेमात काजोलही अजय देवगण सोबत दिसणार आहे, तेही तानाजी यांच्या पत्नीच्या भूमिकेत.

या सिनेमात अजय देवगण हा शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र आणि सुबेदार तानाजी मालुसरे यांची भूमिका निभावतो आहे. माहितीनुसार, या सिनेमात काजोल अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. यासाठी काजोलने एक गाणं शूट केल्याचीही माहिती आहे.

काजोल आणि अजय देवगण यांची जोडी नेहमी हिट ठरली आहे. ते मग सिनेमांमध्ये असो किंवा खऱ्या आयुष्यात. या दोघांनी आजवर ‘राजू चाचा’, ‘प्यार तो होना ही था’, ‘यू मी और हम’ यांसारख्या अनेक सिनेमांत काम केले आहे. तसेच या सिनेमाच्या निमित्ताने 12 वर्षांनंतर अजय देवगण आणि सैफ अली खान पुन्हा एकदा एका सिनेमात दिसणार आहेत. याआधी त्यांनी ओमकारा या सिनेमात सोबत काम केले होते. अजय देवगणने ‘तानाजी : द अनसंग वॉरीअर’ या सिनेमाचं पोस्टर नवीन वर्षाच्या पहिल्याचं दिवशी शेअर केलं होतं. हा सिनेमा 22 नोव्हेंबर 2019 ला रिलीज होण्याची शक्याता आहे.

तानाजी मालुसरे कोण होते ?

तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणी मित्र होते, तसेच ते मराठा साम्राज्याचे वीर सुबेदार होते. स्वराज्य स्थापनेपासून प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत त्यांचा सहभाग होता. ते 4 फेब्रुवारी 1970 रोजी झालेल्या कोंढाण्याच्या लढाईसाठी ओळखले जातात.

कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंना दिली होती. तेव्हा आपल्या मुलाचं लग्न अर्धवट सोडून त्यांनी “आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे” म्हणत कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला. किल्ल्यावर ताबा मिळवण्यासाठी त्यांना आपल्या प्राणांची आहूती द्यावी लागली. शिवाजी महाराजांनी “गड आला पण सिंह गेला”, या शब्दांत तानाजीच्या मृत्यूचे दु:ख व्यक्त केले होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *