स्वरा भास्कर आई होणार, आता आणखी वाट नाही बघू शकत, स्वराची कौतुकास्पद इच्छा!

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस दिवाळी निमित्ताने स्वरा भास्करने (Swara Bhasker) लहान मुलांसोबत सण साजरा करण्यासाठी दिल्लीतील एका स्थानिक अनाथाश्रमाला भेट दिली होती. या भेटीदरम्यान, मुलांशी संवाद साधताना आणि खेळताना तिला स्वतःमध्ये मातृत्व जाणवले.

स्वरा भास्कर आई होणार, आता आणखी वाट नाही बघू शकत, स्वराची कौतुकास्पद इच्छा!
Swara Bhasker


मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस दिवाळी निमित्ताने स्वरा भास्करने (Swara Bhasker) लहान मुलांसोबत सण साजरा करण्यासाठी दिल्लीतील एका स्थानिक अनाथाश्रमाला भेट दिली होती. या भेटीदरम्यान, मुलांशी संवाद साधताना आणि खेळताना तिला स्वतःमध्ये मातृत्व जाणवले. या क्षणीच तिने मूल दत्तक घेऊन, पालक बनण्याचा निर्णय पक्का केला. अभिनेत्रीने तातडीने केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (CARA) मध्ये ‘संभाव्य दत्तक पालक’ (Prospective Adoptive Parent ) म्हणून नोंदणी केली आहे आणि मूल दत्तक घेण्याच्या प्रतीक्षा यादीत तिच्या नावाचा समवेश झाला आहे.

अभिनेत्री स्वर भास्कर नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि बेधडक मतांमुळे चर्चेत असते. मात्र, यावेळी पालक बनण्याच्या निर्णयामुळे ती चर्चेत आहे. तिच्या या धाडसी निर्णयाचे भरपूर कौतुक देखील केले जात आहे.

इच्छा होतीच! आता निर्णय घेतला…

स्वरा म्हणाली की, ‘ही कल्पना तिच्या मनात खूप दिवसांपासून होती, पण अलीकडेच तिने याबाबत ठाम निर्णय घेतला आहे. युनिसेफच्या म्हणण्यानुसार भारतात 2.9 कोटीहून अधिक अनाथ मुले आहेत. त्यापैकी 5 लाखांहून कमी मुले अनाथाश्रमात आहेत. हे आकडे अतिशय धक्कादायक आहेत. शिवाय, बाल न्याय [मुलांची काळजी आणि संरक्षण] अधिनियम 2015 नुसार, एकदा ही अनाथ मुले 18 वर्षांची झाली की, राज्य त्यांची जबाबदारी अथवा काळजी घेणे सोडून देते. याचा अर्थ ते रस्त्यावर येतात’.

खूप संशोधन केले…

पुढे स्वरा म्हणाली की, ‘मला नेहमीच एक कुटुंब आणि मुले हवी आहेत. पालक बनण्यासाठी विवाह करणे गरजेचे नाही. सुदैवाने भारतात, राज्य एकल महिलांना मुलं दत्तक घेण्याची परवानगी देते. मी अनेक जोडप्यांना भेटले, ज्यांनी मुले दत्तक घेतली आहेत, दत्तक घेतलेल्या आणि आता जवळजवळ प्रौढ झालेल्या काही मुलांना भेटले. यातील प्रक्रिया आणि अनुभव देखील जाणून घेतले’.

आता आणखी वाट पाहू शकत नाही!

अभिनेत्रीने तिला संपूर्ण मार्गदर्शन केल्याबद्दल CARA अधिकार्‍यांचे आभार मानले आहेत. ‘त्यांनी मला ही संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यात मदत केली. या सर्व संशोधनानंतर, मी माझ्या पालकांशी बोलले, ज्यांनी माझ्या निर्णयाला सहमती दर्शवली आणि आता माझ्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला आहे.’  स्वर म्हणाली की, ‘मी आता CARA वर संभाव्य दत्तक पालक म्हणून प्रतीक्षा यादीत आहे. मला माहित आहे की प्रतीक्षा कालावधी मोठा आहे. परंतु, आता मी दत्तक मुलाचे पालक होण्याची प्रतीक्षा करू शकत नाही.’ वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, भास्करने नुकताच सोहो लंडन इंडिपेंडंट फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘शीर कोरमा’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे.

हेही वाचा :

उफ्फ तेरी अदा…मौनी रॉयने सोशल मीडियावर शेअर केले ‘इनसाइड द बेडरूम’ फोटो!

Bigg Boss 15 | शॉकिंग! ‘बिग बॉस 15’मध्ये वाईल्ड कार्ड बनून एंट्री केलेले अभिजीत बिचुकले कोरोनाच्या विळख्यात!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI