पहिल्याच चित्रपटाच्या रिलीजनंतर हृतिक रोशनला आले होते तब्बल हजारो लग्नाप्रस्ताव! वाचा किस्सा…

अभिनेता हृतिक रोशनने (Hritik Roshan) आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याला चित्रपट जगतात ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखले जाते. हृतिक रोशनने 2000 मध्ये 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.

पहिल्याच चित्रपटाच्या रिलीजनंतर हृतिक रोशनला आले होते तब्बल हजारो लग्नाप्रस्ताव! वाचा किस्सा...
Hrithik Roshan
Follow us
| Updated on: Oct 17, 2021 | 7:21 AM

मुंबई : अभिनेता हृतिक रोशनने (Hritik Roshan) आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याला चित्रपट जगतात ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखले जाते. हृतिक रोशनने 2000 मध्ये ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश रोशन यांनी केले होते. त्याच्या पहिल्याच चित्रपटापासून हृतिकने सांगितले होते की, तो चित्रपट जगतात एक लांबचा पल्ला गाठणार आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये हृतिकने खुलासा केला होता की, त्याचा पहिला चित्रपट मुलींना खूप आवडला होता.

जेव्हा कपिलने हृतिकला विचारले की, आम्ही ऐकले आहे की, ‘तुमचा पहिला चित्रपट रिलीज झाल्यानंतर तुम्हाला व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने 30 हजारांहून अधिक लग्नाचे प्रस्ताव आले होते आणि त्यांनी लग्नासाठी प्रस्ताव दिले होते.’ याला प्रतिसाद देत  हृतिक म्हणाला होता की, ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मला तीस नाही तर तीन हजारांहून अधिक प्रस्ताव मिळाले होते.’

ग्रीसमध्ये हृतिकची पूजा?

हृतिक रोशनच्या जगामध्ये ‘ग्रीक देव’ म्हणून ओळखला जायला लागला यावर कपिल शर्माने देखील त्याला विचारले की, ग्रीसमध्ये तुमची पूजा केली जायची का? यावर प्रतिक्रिया देताना हृतिक रोशन म्हणाला, ‘खरं तर मी एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी ग्रीसला गेलो होतो आणि मला वाटू लागलं की मी देव आहे, पण जेव्हा मी विमानतळावर पोहोचलो तेव्हा कोणीही मला ओळखलं नाही. नंतर मला कळले की लोक माझ्याशी खोटे बोलत आहेत’. अर्थात हा एक गमतीचा भाग होता.

जेव्हा राकेश रोषण हृतिकवर चिडतात!

हृतिक रोशनने पुढे सांगितले की, त्याच्याकडून एकदा अशी चूक झाली, ज्यामुळे त्याचे वडील खूप रागावले होते. हृतिक म्हणाला, ‘एकदा आमच्या घराचे लाईट बिल तीन हजार रुपयांपर्यंत आले, त्यानंतर वडील माझ्यावर खूप चिडले आणि त्यांनी घरातील सर्व दिवे बंद केले. मी माझ्या वडिलांकडून अनेक गोष्टी शिकलो आहे. त्यांच्याकडून मी प्रत्येक गोष्टीची किंमत कशी करायची ते शिकलो.’

अमिषा पटेलचे बॉलिवूड पदार्पण

अभिनेत्री अमिषा पटेल हिने या चित्रपटातून पदार्पण केले होते. हृतिक रोशनसोबत अमिषा पटेलनेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 14 जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 80 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटात हृतिक रोशन व्यतिरिक्त अनुपम खेर, दिलीप ताहिल देखील मुख्य भूमिकेत होते.

दीपिकासोबत चित्रपटात झळकणार

आगामी चित्रपटात हृतिक रोशन दीपिकासोबत दिसणार आहे. पहिल्यांदा तो दीपिका पदुकोणसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘फायटर’ चित्रपटात दीपिका आणि हृतिकची जोडी प्रेक्षकांसमोर दिसणार आहे. सिद्धार्थने यापूर्वी हृतिकसोबत ‘वॉर’ हा चित्रपट बनवला आहे, ज्यात वाणी कपूर प्रमुख भूमिकेत होती. तर, टायगर श्रॉफने समांतर भूमिका साकारली होती. अलीकडेच हृतिक रोशनने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून काही छायाचित्रे शेअर केली आहेत आणि फायटरचे शूटिंग सुरू झाल्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा :

‘सरदार उधम’च्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचले बॉलिवूड स्टार्स, कतरिनापासून सिद्धार्थपर्यंत कलाकारांचा जलवा

ऋतुराज गायकवाडची दमदार खेळी, मैदानीतील धुव्वेबाजी पाहून चाहत्यांना आली मराठी अभिनेत्रीची आठवण!

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.