Ameesha Patel | अमीषा पटेलने ट्वीटरवर दिली प्रेमाची कबुली, पाहा कोण आहे ‘हा’ खास व्यक्ती?

Ameesha Patel | अमीषा पटेलने ट्वीटरवर दिली प्रेमाची कबुली, पाहा कोण आहे ‘हा’ खास व्यक्ती?
Ameesha Patel

बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल (Ameesha Patel) सध्या तिच्या आगामी 'गदर 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती पुन्हा एकदा तारा सिंगच्या लेडी लव्ह ‘सकीना’ या व्यक्तिरेखेद्वारे कमबॅक करत आहे. अमीषा तिच्या कामामुळे चर्चेत असतेच, पण त्याचवेळी तिच्या एका ट्विटमुळे सोशल मीडियावरही तिचा बोलबाला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jan 04, 2022 | 11:18 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल (Ameesha Patel) सध्या तिच्या आगामी ‘गदर 2’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती पुन्हा एकदा तारा सिंगच्या लेडी लव्ह ‘सकीना’ या व्यक्तिरेखेद्वारे कमबॅक करत आहे. अमीषा तिच्या कामामुळे चर्चेत असतेच, पण त्याचवेळी तिच्या एका ट्विटमुळे सोशल मीडियावरही तिचा बोलबाला आहे. अमीषाने नुकतेच फैसल पटेलला (Faisal Patel) ट्विटरच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तिच्या या ट्विटनंतर अमीषा पटेल फैसलला डेट करत असल्याचा अंदाज यूजर्स लावत आहेत. तिचे हे ट्विट फैसलनेही रिट्विट केले आहे. मात्र, दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

पाहा पोस्ट :

खरंतर अमीषा पटेलने 30 डिसेंबर 2021 रोजी ट्विटरवर फैसलसोबतचे काही फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करत अमिषाने फैसलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिने ट्विट करून लिहिले की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा माय डार्लिंग फैसल पटेल. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुमचे येणारे वर्ष छान जावो.’ यासोबतच अमीषा पटेलने अनेक हार्ट इमोजीही पोस्ट केले आहेत. या ट्विटनंतर लोक त्यांच्या नात्याबद्दल अंदाज लावू लागले आहेत. फैसल पटेल हा दिवंगत राजकारणी अहमद पटेल यांचा मुलगा आहे.

आम्ही केवळ चांगले मित्र!

यानंतर फैसल पटेल याची बहीण मुमताजने देखील एक ट्विट शेअर केले आहे. या स्क्रीन शॉटमध्ये मुमताज पटेल यांनी अमीषाच्या ट्विटबद्दल लिहिले आहे. ती म्हणाली की, ‘सोशल मीडिया/ मीडियाला विनंती आहे की, डिलीट केलेले ट्विट जास्त वाचू नका, अमीषा पटेल आम्हाला कुटुंबाप्रमाणे आहे, आम्ही तीन पिढ्यांपासून मित्र आहोत. तो फक्त एक विनोद होता. कृपया हा विनोद म्हणूनच घ्या!’

‘गदर 2’मधून कमबॅक

बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol), अभिनेत्री अमीषा पटेल (Ameesha Patel) आणि अमरीश पुरी अभिनित सुपरहिट फिल्म ‘गदर : एक प्रेम कथा’ (Gadar: Ek Prem Katha) आजपर्यंत प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. तरच,  प्रत्येकजण या चित्रपटाचा भाग 2 तयार होण्याची वाट पाहत आहे. अशी अपेक्षा आहे की, लवकरच त्यांची ही प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. मेकर्स या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याचा विचार करत आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा सनी आणि अमीषाची जबरदस्त केमिस्ट्री प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येईल.

‘गदर’ चित्रपटाचे नाव उच्चारले की, तो हँडपंप उखडण्याचा सीन प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतो. हा सीन पाहून प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला होता. असेच काहीतरी पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी आता याचा खुलासा केला आहे. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, ‘गदर’ चे निर्माते यावेळी तयार होणारा सिक्वेल लक्षात घेऊन प्लॉट आणि स्क्रिप्टवर काम करत आहेत.

हेही वाचा :

स्वप्नील जोशीने नवीन वर्षातील नवीन चित्रपटाची केली घोषणा, ‘अश्वत्थ’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!

जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रियादेखील कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती!

Khatija | वाढदिवशीच खातिजा अडकली खास नात्यात!, पाहा कोण आहे ए आर रहमानचा होणारा जावई Riyasdeen?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें