खरोखरच चंकी पांडेची लेक अनन्या ‘या’ अभिनेत्याला करत आहे डेट? पाहा फोटो

शितल मुंडे, Tv9 मराठी

Updated on: Oct 21, 2022 | 11:38 AM

करण जोहरने कॉफी विथ करण सीजन 7 मध्ये तर शिक्कामोर्तब केले होते. मात्र, त्यावेळी अनन्या पांडेने वेळ मारून नेली होती.

खरोखरच चंकी पांडेची लेक अनन्या 'या' अभिनेत्याला करत आहे डेट? पाहा फोटो

मुंबई : चंकी पांडेची (Chunky Panday) लेक अनन्या आणि आदित्य रॉय एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. यावर करण जोहरने कॉफी विथ करण सीजन 7 मध्ये तर शिक्कामोर्तब केले होते. मात्र, त्यावेळी अनन्या पांडेने (Ananya Panday) वेळ मारून नेली होती. अनन्या पांडेचे नाव आदित्य रॉयसोबत जोडले जात आहे. मात्र, यावर आदित्य रॉय किंवा अनन्या पांडेने काही भाष्य केले नाहीये. बऱ्याच वेळा हे दोघेसोबत स्पाॅट (Spat) देखील होतात.

नुकताच अनन्या आणि आदित्यचे काही फोटो पुढे आल्याने परत एकदा चर्चांना वाव फुटले आहे. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये अनन्या आणि आदित्यने एकाच रंगाचे कपडे देखील घातले आहेत. अनन्या आणि आदित्य दिवाळी पार्टीतसोबतच पोहचले होते. इतकेच नाही तर दोघांनीसोबतच पोज देखील दिल्या आहेत. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत अनन्या पांडे आणि आदित्य राॅयसोबत आले होते. इतकेच नाही तर पार्टीमध्येही दोघेपणसोबतच फिरत होते. यामुळे नक्कीच अनन्या आणि आदित्यमध्ये काही तरी सुरू असल्याच्या चर्चांना आता उधाण आले आहे. मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत पोहचलेल्या अनन्याचा लूक सुंदर दिसत होता.

अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडाचा लाइगर चित्रपट हा काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. मात्र, जेवढी या चित्रपटाची चर्चा होती, तेवढा हा चित्रपट काही खास कमाल नक्कीच करू शकला नाहीये. लाइगर चित्रपटाच्या अपयशाचे सर्व खापर हे अनन्या पांडेवर फोडण्यात आले होते.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI