Akshay Kumar | अक्षय कुमार दणदणीत पुनरागमन करणार, या मोठ्या चित्रपटाची घोषणा

आता हे नेमके नवीन काय होते, हे कळाले असून अक्षय कुमारने नुकताच त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केलीये.

Akshay Kumar | अक्षय कुमार दणदणीत पुनरागमन करणार, या मोठ्या चित्रपटाची घोषणा
Follow us
| Updated on: Dec 04, 2022 | 7:52 PM

मुंबई : अक्षय कुमार याच्यासाठी 2022 हे वर्ष काही खास गेले नाहीये. या वर्षात अजय कुमारचे तब्बल 5 चित्रपट रिलीज झाले. मात्र, एकाही चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर धमाका करण्यात यश मिळाले नाही. अक्षय कुमारच्या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अक्षयने सांगितले होते की, यावेळी काहीतरी नवीन आणि खास करतोय. आता हे नेमके नवीन काय होते, हे कळाले असून अक्षय कुमारने नुकताच त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केलीये.

अक्षयने सांगितल्याप्रमाणे यावेळी तो काहीतरी वेगळी नक्कीच येऊन आलाय. अक्षय कुमारचा आगामी चित्रपट हा सेक्स एज्युकेशनवर आधारित असणार आहे. हा एक सामाजिक चित्रपट असल्याचे देखील अक्षयने स्पष्ट केले आहे.

या चित्रपटाबद्दल बोलताना अक्षय कुमार म्हणाला की, मला नेहमीच सामाजिक विषयावरील चित्रपट करायला आवडतात. विशेष म्हणजे माझ्या आतापर्यंतच्या करिअरमधील हा चित्रपट सर्वात खास आणि माझ्यासाठी स्पेशल आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

आपण सर्वजण शाळेमध्ये विविध विषय शिकतो. परंतू मला वाटते की, शाळेमध्ये सेक्स एज्युकेशन हा विषय देखील शिकवला पाहिजे. हे अत्यंत गरजेचे आहे. संपूर्ण जगात हा विषय शाळेमध्ये शिक्षणासाठी ठेवायला हवा.

अक्षयने या चित्रपटाविषयी बोलताना सांगितले की, हा चित्रपट तयार होण्यास नक्कीच वेळ लागणार आहे. साधारण एप्रिल किंवा मे मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो, असेही अक्षय कुमार म्हणाला आहे.

काही दिवसांपूर्वीच अक्षयने हेरा फेरी 3 हा चित्रपट करण्यास नकार दिलाय. यामुळे आता अक्षय कुमारऐवजी या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन हा दिसणार आहे. स्क्रीप्ट आवडली नसल्याने त्याने या चित्रपटाला नकार दिलाय.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.