Photoshoot | रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटनंतर पत्नी दीपिकाने शेअर केले लेटेस्ट फोटो, चाहते म्हणाले की…

रणवीर सिंह त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे अडचणीत सापडला आहे. रणवीरवर मुंबईत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. इंदूरमध्येही रणवीरच्या न्यूड फोटोशूटचा जोरदार विरोध सुरू आहे. फोटोशूटमध्ये कपल्स खूपच सुंदर दिसत आहेत.

Photoshoot | रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटनंतर पत्नी दीपिकाने शेअर केले लेटेस्ट फोटो, चाहते म्हणाले की...
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jul 30, 2022 | 10:12 AM

मुंबई : रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) न्यूड फोटोशूटमुळे मोठे वादळ निर्माण झाले. इतकेच नाहीतर हा फोटोशूटच्या विषय थेट पोलिस ठाण्यात देखील पोहचला आहे. न्यूड फोटोशूटमुळे (Photoshoot) रणवीरवर मुंबईत गुन्हा देखील झालायं. काहींनी रणवीरचे समर्थ करत रणवीरने काय करावे हा त्याचा प्रश्न असल्याचे म्हटले आहे तर काहींनी रणवीरच्या विरोधात मोर्चा वळवला आहे. मात्र, यादरम्यान अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आपल्या नवऱ्याच्या न्यूड फोटोसंदर्भात नेमके काय भाष्य करते, याकडे सर्वांचे लक्ष होते. यावर दीपिकाची काहीही प्रतिक्रिया कळू शकली नाहीयं. मात्र नुकताच दीपिकाने सोशल मिडियावरती काही फोटो शेअर केले आहेत.

रणवीरच्या न्यूड फोटोची सर्वत्र चर्चा

रणवीर सिंह सध्या चर्चेचा भाग आहे. जेव्हापासून रणवीरने कपड्यांशिवाय फोटोशूट केले आहे, तेव्हापासून तो सर्वत्र चर्चेत आहे. रणवीर सिंहच्या या फोटोशूटवरून बराच गदारोळ झाला होता. रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटनंतर आता त्याची पत्नी दीपिका पदुकोणने लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. दीपिकाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. दीपिकाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दीपिका आणि रणवीर खूपच सुंदर दिसत आहेत. चाहते सतत त्याच्या फोटोंवर कमेंट करत असतात. विशेष म्हणजे चाहत्यांना त्यांचे हे फोटो प्रचंड आवडल्याचे दिसते आहे.

रणवीर सिंह न्यूड फोटोशूटमुळे अडचणीत सापडला

रणवीर सिंह त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे अडचणीत सापडला आहे. रणवीरवर मुंबईत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. इंदूरमध्येही रणवीरच्या न्यूड फोटोशूटचा जोरदार विरोध सुरू आहे. फोटोशूटमध्ये कपल्स खूपच सुंदर दिसत आहेत. रणवीर सिंहने पांढऱ्या आणि काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत तर दीपिका पदुकोणने क्रीम कलरच्या लेहेंगा घातला आहे. दीपिका आणि रणवीरने केलेल्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

दीपिकाने शेअर केले नवीन फोटो

अभिनेता रणवीर सिंह याचं हे वादग्रस्त फोटोशूट आल्यानंतर समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी यावर सवाल उपस्थित केले होते. एखाद्या अभिनेत्याचे नग्न फोटो चालतात मात्र मुलींनी त्यांच्या मर्जीने हिजाब घातलेला चालत नाही. हे आपण कोणत्या सांस्कृतिककडे चाललो आहे. असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच इतरही अनेक लोकांनी यावर टीका केली होती. मात्र बॉलीवूड मधील काही मंडळी ही रणवीर सिंहच्या समर्थनार्थ उभा राहिली होती. त्याला योग्य वाटतं ते त्यानं केलं. तो त्यात कम्फर्टेबल असेल तर त्याने ते करावं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें