‘दम मारो दम’ ते ‘उडता पंजाब’, बॉलिवूड चित्रपटांनी प्रेक्षकांना दाखवलं ‘ड्रग्ज’ विश्वाचं काळं सत्य!

बॉलिवूडमध्ये ड्रग्जवर आधरित कथा तशा नवीन नाहीत. अभिनेता संजय दत्तपासून ते फरदीन खानपर्यंत अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींची नावे ड्रग्जशी जोडली गेली आहेत. या यादीत आर्यन खानचे नाव मात्र नवीन आहे. बॉलिवूडमध्ये ड्रग्ज या विषयावर चित्रपट देखील बनले गेले आहेत.

‘दम मारो दम’ ते ‘उडता पंजाब’, बॉलिवूड चित्रपटांनी प्रेक्षकांना दाखवलं ‘ड्रग्ज’ विश्वाचं काळं सत्य!
Film On Drugs
Follow us
| Updated on: Oct 21, 2021 | 8:02 AM

मुंबई : बॉलिवूडमध्ये ड्रग्जवर आधरित कथा तशा नवीन नाहीत. अभिनेता संजय दत्तपासून ते फरदीन खानपर्यंत अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींची नावे ड्रग्जशी जोडली गेली आहेत. या यादीत आर्यन खानचे नाव मात्र नवीन आहे. बॉलिवूडमध्ये ड्रग्ज या विषयावर चित्रपट देखील बनले गेले आहेत आणि या चित्रपटांवर देखील बरेच वाद झाले आहेत. या यादीतील पहिले नाव उडता पंजाबचे आहे. या चित्रपटाच्या रिलीजबाबत बराच गदारोळ झाला होता.

राजकीय पक्षांनी या चित्रपटाबद्दल बोलताना म्हटले होते की, यामुळे पंजाबची प्रतिमा खराब होते आहे. या व्यतिरिक्त, ड्रग्जला केंद्रस्थानी ठेवून अनेक चित्रपट बनवले गेले आहेत. चला तर, जाणून घेऊया असे कोणते चित्रपट आहेत, ज्यांची स्क्रिप्ट ड्रग्जवर आधारित होती आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांनी काय आश्चर्यकारक कामगिरी केली? जाणून घ्या या चित्रपटांबद्दल..

उडता पंजाब

‘उडता पंजाब’ हा चित्रपट पंजाबमधील तरुणांमध्ये उपस्थित असलेल्या ड्रग्जच्या समस्यांवर बनवण्यात आला आहे. त्यात दिलजीत दोसांझ, करीना कपूर, शाहिद कपूर आणि इतर अनेक मोठे कलाकार होते. या चित्रपटासंदर्भात पंजाबमध्ये खूप गदारोळ झाला आणि तो अनेक ठिकाणी प्रदर्शितही होऊ शकला नाही. बॉक्स ऑफिसबद्दल बोलायचे झाले, तर या चित्रपटाने चांगली कामगिरी केली होती. दिलजीत दोसांझला या चित्रपटातून मोठी ओळख मिळाली होती.

दम मारो दम

‘दम मारो दम’ हा चित्रपट 2011 मध्ये प्रदर्शित झाला होता. गोव्याच्या कथेवर आधारित या चित्रपटात बिपाशा बसू, अभिषेक बच्चन आणि राणा दग्गुबती यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही, पण या चित्रपटाची गाणी खूप हिट झाली.

संजू

राजकुमारी हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटात रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका उत्तम साकारली होती. संजूच्या जीवनावर आधारित हा बायोपिक होता. या चित्रपटात दाखवण्यात आले होते की, त्याला ड्रग्सचे इतके व्यसन कसे झाले होते की, त्याला उपचारासाठी अमेरिकेत जावे लागले होते.

कालाकांडी

‘कालाकांडी’ हा चित्रपट 2018 मध्ये आला होता. या चित्रपटात सैफ अली खान मुख्य भूमिकेत होता. हा एक गडद थरारक विनोदी चित्रपट होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नाही. सैफ व्यतिरिक्त या चित्रपटात अक्षय ओबेरॉय, कुणाल रॉय कपूर, दीपक डोबरियाल, ईशा तलवार, शोभिता धुलीपाला सारखे स्टार्स देखील होते.

हेही वाचा :

‘झिम्मा’वर थिरकणार अवघा महाराष्ट्र, नव्या मराठी चित्रपटाचे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

Raja Rani Chi Ga Jodi : संजीवनी रणजीत ढाले पाटलांचा SWAG, पाहा अभिनेत्री शिवानी सोनारचे खास फोटो

Aai Kuthe Kay Karte | अरुंधतीच्या आयुष्यात येणार नवा पाहुणा, बदलणार देशमुखांच्या घराची सूत्र!

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.