Katrina-Vicky Wedding | करण जोहर ते नेहा धुपिया, पहा कोणकोणते सेलेब्रिटी विकी-कतरिनाच्या लग्नात होणार सहभागी..

बॉलिवूडचे लव्हबर्ड्स आता एकत्र होणार आहेत. कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांचे प्रेम भलेही, गुपचूप बहरले असेल, परंतु संपूर्ण जग त्यांच्या लग्नाचे साक्षीदार होणार आहे.

Katrina-Vicky Wedding | करण जोहर ते नेहा धुपिया, पहा कोणकोणते सेलेब्रिटी विकी-कतरिनाच्या लग्नात होणार सहभागी..
Vicky-Katrina
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 12:59 PM

मुंबई : बॉलिवूडचे लव्हबर्ड्स आता एकत्र होणार आहेत. कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांचे प्रेम भलेही, गुपचूप बहरले असेल, परंतु संपूर्ण जग त्यांच्या लग्नाचे साक्षीदार होणार आहे. लव्ह बर्ड कतरिना कैफ आणि विकी कौशल 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. आजपासून लग्नपूर्व सोहळे सुरू होत आहेत. दरम्यान, विकी आणि कतरिनाच्या लग्नात सामील होणाऱ्या पाहुण्यांची यादी समोर आली आहे.

राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे होणाऱ्या कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाच्या पाहुण्यांच्या यादीत करण जोहर आणि फराह खान या दोन बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे आघाडीवर आहेत. या जोडप्याच्या लग्नाला फक्त 120 लोक हजर असल्याचं वृत्त आहे, मात्र फराह आणि करणसह बॉलीवूड इंडस्ट्रीतील फक्त 9 लोक या गेस्ट लिस्टमध्ये सामील आहेत.

कतरिना-विकीच्या पाहुण्यांच्या यादीत फक्त ‘याच’ लोकांची नावे!

– फराह खान

– करण जोहर

– नित्या मेहरा

– अंगद बेदी

– नेहा धुपिया

– शर्वरी वाघ (सनी कौशलची मैत्रीण)

– कबीर खान

– मिनी माथूर

– अंगिरा धर

– डॉक्टर ज्वेल गमाडिया (कतरिना होलिस्टिक डॉक्टर) )

– यास्मिन कराचीवाला (कतरिनाची ट्रेनर)

– अमित ठाकूर (हेअरस्टायलिस्ट)

– डॅनियल (मेकअप आर्टिस्ट)

पाहुण्यांच्या यादीत सलमान-अक्षयचे नाव नाही!

कतरिना कैफच्या लग्नातील पाहुण्यांची यादी समोर आल्यानंतर चाहते थोडे आश्चर्यचकित झाले आहेत. अभिनेत्रीच्या पाहुण्यांच्या यादीत बॉलिवूड स्टार सलमान खान आणि अक्षय कुमार या दोघांचेही नाव नाही. सलमान खान हा कतरिनाचा जवळचा मित्र आहे. कतरिनाने सलमानसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. कतरिनाचे सलमानच्या कुटुंबाशीही खास नाते आहे. दुसरीकडे, कतरिनाची अक्षय कुमारशीही खास मैत्री आहे. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. पण, तरीही कतरिनाच्या लग्नाच्या पाहुण्यांच्या यादीत सलमान आणि अक्षय या दोघांचीही नावं दिसत नाहीयत.

नेहा धूपिया-अंगद बेदी कतरिनाच्या लग्नासाठी रवाना!

बेस्ट फ्रेंड कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी नेहा धुपिया आणि अंगद बेदीही मुंबईहून राजस्थानला रवाना झाले आहेत. या जोडप्याला विमानतळावर स्पॉट करण्यात आले होते. यावेळी नेहा आणि अंगद बेदी निळ्या रंगाच्या पोशाखात अगदी मॅचिंग दिसत आहेत. गायक गुरदास मानही या जोडप्याच्या लग्नासाठी राजस्थानला रवाना झाला आहे.

हेही वाचा :

Janhvi Kapoor | परी म्हणू की सुंदरा… जान्हवी कपूरच्या दिलखेचक अदा पाहून चाहतेही घायाळ!

Priya Bapat | ‘मैं भी गुलाबी तू है गुलाबी, दिन भी गुलाबी है गुलाबी ये कहर…’, प्रिया बापटच्या स्मायलिंग अंदाजावर खिळल्या नजरा!

RRR Movie | प्रदर्शनापूर्वीच RRR चित्रपटाचा नवा विक्रम! अमेरिकेतील बहुसंख्य मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.