Happy Birthday Bhumika Chawla | ‘तेरे नाम’मुळे रातोरात हिट झाली, सुशांत सिंह राजपूतची बहिण बनूनही भूमिका चावलाने प्रसिद्धी मिळवली!

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री भूमिका चावला (Bhumika Chawla ) 21 ऑगस्ट रोजी तिचा वाढदिवस साजरा करते. ती अशा बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटातून मोठ्या पडद्यावर अमिट छाप सोडली आणि प्रेक्षकांची मने जिंकली.

Happy Birthday Bhumika Chawla | 'तेरे नाम'मुळे रातोरात हिट झाली, सुशांत सिंह राजपूतची बहिण बनूनही भूमिका चावलाने प्रसिद्धी मिळवली!
भूमिका चावला

मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री भूमिका चावला (Bhumika Chawla ) 21 ऑगस्ट रोजी तिचा वाढदिवस साजरा करते. ती अशा बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटातून मोठ्या पडद्यावर अमिट छाप सोडली आणि प्रेक्षकांची मने जिंकली. भूमिका चावलाच्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी, आम्ही तुम्हाला तिच्या आयुष्याबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत…

भूमिका चावलाचा जन्म 21 ऑगस्ट 1978 रोजी दिल्लीत झाला. तिने करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. यानंतर, त्याने हिंदी, तेलुगु, तमिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आणि बरीच चर्चेत आली. भूमिका चावलाने तिच्या करिअरची सुरुवात तेलुगु चित्रपट ‘युवककुडू’ने केली. यानंतर तिने बराच काळ तेलुगु आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले.

पहिलाच बॉलिवूड चित्रपट सुपरहिट ठरला!

भूमिका चावलाला 2001मध्ये तेलुगु चित्रपट ‘कुशी’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. अभिनेता सलमान खानच्या ‘तेरे नाम’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा हा चित्रपट 2003मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील भूमिका चावलाच्या पात्राचे नाव निर्जरा होते, जे आजही पसंत केले जाते. भूमिका चावला बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या चित्रपटाने खूप प्रसिद्ध झाली.

दक्षिणात्य मनोरंजन विश्वात चालली जादू

यानंतर भूमिका चावलाला अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. 2004मध्ये ती अभिषेक बच्चन सोबत ‘रन’ या चित्रपटात दिसली. परंतु, तिच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही विशेष जादू दाखवली नाही. या चित्रपटानंतर भूमिका चावलाने पुन्हा सलमान खानसोबत ‘सिलसिला’ आणि ‘दिल जो भी कहे’ या चित्रपटांमध्ये काम केले, पण दोन्ही चित्रपट सुपर फ्लॉप झाले. बॉलिवूडमध्ये स्वतःची विशेष कारकीर्द न झाल्यामुळे भूमिकाने पुन्हा दक्षिण सिनेमाकडे आपला मोर्चा वळवला. इथे तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले जे सुपर हिटही झाले.

सुशांतची बहिण बनूनही मिळवली प्रसिद्धी!

भूमिका चावला अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ‘एमएस धोनी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातही दिसली होती. या चित्रपटात तिने सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीची भूमिका साकारली होती. भूमिका चावलाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना, तिने योगा शिक्षक भरत ठाकूरशी लग्न केले आहे. लग्नापूर्वी, दोघांनी एकमेकांना बरेच वर्ष डेट केले होते आणि 2007मध्ये त्यांनी लग्न केले. 2014 साली भूमिकाने एका मुलाला जन्म दिला. फिल्मी नसलेल्या पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीशी विवाह केलेली भूमिका आज तिच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे.

हेही वाचा :

सौदी अरेबिया, कतार आणि कुवैतमध्ये अक्षयच्या ‘बेल बॉटम’वर बंदी! नेमकं कारण काय?

ड्रामा क्वीन राखी सावंत म्हणतेय, ‘मला भाईजान सलमान खानला राखी बांधायचीय, कारण…’

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI