Happy Birthday Satish Kaushik | अभिनेता व्हायचे म्हणताच भावाने फेकून मारले ताट, वाचा सतीश कौशिक यांच्या अभिनयप्रवासाबद्दल…

अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) हे बॉलिवूड इंडस्ट्रीचे असे नाव आहे, ज्यांनी भारतीय सिनेमासाठी अनेक सर्वोत्कृष्ट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आणि लोकांच्या मनात अजूनही त्या व्यक्तिरेखा जिवंत आहेत.

Happy Birthday Satish Kaushik | अभिनेता व्हायचे म्हणताच भावाने फेकून मारले ताट, वाचा सतीश कौशिक यांच्या अभिनयप्रवासाबद्दल...
सतीश कौशिक
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 10:40 AM

मुंबई : अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) हे बॉलिवूड इंडस्ट्रीचे असे नाव आहे, ज्यांनी भारतीय सिनेमासाठी अनेक सर्वोत्कृष्ट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आणि लोकांच्या मनात अजूनही त्या व्यक्तिरेखा जिवंत आहेत. इतकेच नाही तर त्यांनी बर्‍याच चित्रपटांच्या कथा देखील लिहिल्या आहेत. त्यांनी साकारलेल्या पात्रांपैकी ‘मिस्टर अँड मिसेस खिलाडी’मधील चंदा मामा, ‘साजन चले ससुराल’चे मुथु स्वामी आणि ‘मिस्टर इंडिया’मधील कॅलेंडर सर्वात लोकप्रिय ठरल्या आहेत (Happy Birthday Satish Kaushik know about how actors journey start).

त्याचवेळी, सतीश कौशिक यांच्या दिग्दर्शनाविषयी बोलायचे तर ‘रूप की रानी चोरों का राजा’, ‘बधाई हो बधाई’, ‘तेरे नाम’, ‘क्यों की’, ‘हमारा दिल आपके पास है’, ‘मुझे कुछ कहना है’, ‘हमारा दिल आपके पास है’ आणि ‘कागज’सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. सतीश कौशिक यांनी दिग्दर्शन आणि अभिनयच नव्हे तर, बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांची निर्मितीही केली आहे. आज सतीश कौशिकच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्यांच्या या प्रवासाच्या सुरुवातीविषयी जाणून घेणार आहोत…

अभिनय कायाचे ऐकताच भाऊ चिडला!

ही त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा सतीश कौशिक दिल्लीत राहत असत. सतीश कौशिक यांना तीन बहिणी आणि भाऊ आहेत. सतीश कौशिक यांच्या कुटुंबाचा चित्रपटांशी किंवा मनोरंजन विश्वाशी काहीच संबंध नाही. ‘जीना ईसी का नाम है’ या शोवर सतीश कौशिक यांचा मोठा भाऊ बीडी कौशिक यांनी एकदा सांगितले होते की, लहानपणापासूनच सतीश यांची संपूर्ण कुटूंबापेक्षा थोडी वेगळी वागणूक होती. तो चित्रपटात जाण्याचा विचार करेल, असे कधी वाटले नाही.

सतीश कौशिक पहिल्यांदाच आपल्या मोठ्या भावासमोर गेले आणि म्हणाले की, आपल्याला अभिनेता व्हायचे आहे. एकदा सतीश कौशिक यांनी त्यांना सांगितले की, ‘मी मुंबईला जात आहे, मला अभिनयाशिवाय दुसरे काही करण्याची गरज नाही. हे ऐकून, त्यांचा मोठा भाऊ इतका संतापला की, त्यांच्या समोर पडलेला पलंगच उचलून त्यांनी सतीश कौशिक समोर फेकला. यासह त्यांनी सतीश कौशिकसमोर ठेवलेली दहीची प्लेटही देखील फेकून मारली (Happy Birthday Satish Kaushik know about how actors journey start).

पाहा एक धमाल सीन:

बराच काळ चालला वाद!

यानंतर त्यांनी रागाने सतीशला म्हटले की, तुला अभिनेता व्हायचेय? सतीश कौशिकनेही तोंडातून दही काढून टाकत, ते म्हणाले, मी बनेन तर अभिनेताच, नाहीतर मी काही बनणार नाही. सतीश कौशिकच्या घरात बराच काळ हा वाद चालू होता. जेव्हा जेव्हा ते अभिनेता होण्याविषयी बोलायचे तेव्हा त्यांचा मोठा भाऊ खूप रागावायचा.

शेवटी एक दिवस असा आला जेव्हा सतीश कौशिक यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींना राखी बांधल्यानंतर सतीश कौशिक यांनी मुंबईकडे जाणारी ट्रेन पकडली. सतीश स्टेशनवर पोहोचल्यावर त्यांच्या भावाने त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते सतीश कौशिकला रोखू शकला नाही. शेवटी, याच्यावर काहीच फरक पडत नाही म्हटल्यावर भावाने त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

(Happy Birthday Satish Kaushik know about how actors journey start)

हेही वाचा :

Video | हुबेहूब करिश्मा कपूरसारखी दिसतेय ‘ही’ मुलगी, सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून चाहतेही बुचकळ्यात!

परवीन बाबीच्या प्रेमात वेडे झालेल्या कबीर बेदींनी पत्नीपासून घेतला होता घटस्फोट, वैयक्तिक जीवनाविषयी केले अनेक खुलासे!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.