Happy birthday SS Rajamouli | कल्पनेचे जादूगार आहेत ‘बाहुबली’ फेम एसएस राजामौली, अजय-अक्षयच्या कारकीर्दीतही मोठा वाटा!

‘बाहुबली’ या चित्रपटानंतर एसएस राजामौली हे नाव सर्वांनाच परिचित झालं आहे. कर्नाटकच्या रायपूर जिल्ह्यात 10 ऑक्टोबर 1973 रोजी जन्मलेल्या एसएस राजामौली यांचे पूर्ण नाव कोडुरी श्रीशैला राजामौली असे आहे. ते एक तेलुगू चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहेत.

Happy birthday SS Rajamouli | कल्पनेचे जादूगार आहेत ‘बाहुबली’ फेम एसएस राजामौली, अजय-अक्षयच्या कारकीर्दीतही मोठा वाटा!
SS Rajamouli

मुंबई : ‘बाहुबली’ या चित्रपटानंतर एसएस राजामौली हे नाव सर्वांनाच परिचित झालं आहे. कर्नाटकच्या रायपूर जिल्ह्यात 10 ऑक्टोबर 1973 रोजी जन्मलेल्या एसएस राजामौली यांचे पूर्ण नाव कोडुरी श्रीशैला राजामौली असे आहे. ते एक तेलुगू चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहेत. राजामौली यांनी त्यांच्या फिल्मी कारकिर्दीत खूप चांगले चित्रपट बनवले आहेत, त्यापैकी काही जगभरात लोकप्रिय ठरले आहेत. ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ या चित्रपटातून राजामौली यांनी जगभरात दहशत निर्माण केली. याशिवाय राजामौली यांनी मगधीरा, ईगा, छत्रपती सारखे सुपरहिट चित्रपटही केले आहेत.

जेव्हा राजामौली म्हणाले की मी नास्तिक आहे, तेव्हा….

27 एप्रिल 2017 रोजी राजामौली यांनी आपण नास्तिक असल्याचे जाहीर केले. तथापि, 15 मे 2017 रोजी, ते आपल्या संपूर्ण कुटुंबासह मंत्रालयमकडे अर्थात मंदिराकडे चालत जाताना दिसले आणि त्यांचे ग्रामदेवता मनचलम्मा आणि राघवेंद्र स्वामी यांच्या मंदिराला भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

जूनियर एनटीआरसोबत करिअरची सुरुवात

एस एस राजामौली यांनी दिग्दर्शक राघवेंद्र राव यांच्या नेतृत्वाखाली ईटीव्हीवर प्रसारित होणाऱ्या तेलुगु सोप ऑपेराचे दिग्दर्शन करून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. तथापि, त्यांनी 2001 मध्ये ‘स्टुडंट नंबर 1’ सह आपल्या फिल्मी कारकिर्दीची सुरुवात केली, ज्यांचा नायक ज्युनियर एनटीआर होता. हा एक तेलुगु हिट चित्रपट होता.

अक्षय कुमार आणि अजय देवगण यांची कारकीर्दही सावरली!

वास्तविक, 2010 ते 2012 दरम्यान अक्षय कुमारची चित्रपट कारकीर्द तितकीशी चांगली नव्हती, त्याने या 2 वर्षात फक्त दोन हिट चित्रपट दिले होते. पण 2012 मध्ये, अक्षय कुमार ‘राऊडी राठौर’ चित्रपटात दिसला जो एस एस राजामौली यांच्या ‘विक्रमरकुडू’ या चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटातूनच अक्षय कुमारने बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन केले आणि त्यानंतरही त्याने हिट चित्रपट देणे सुरू ठेवले.

अशीच एक कथा अजय देवगणशी देखील संबंधित आहे. अजय देवगणचा सुपरहिट चित्रपट ‘सन ऑफ सरदार’ हा एस एस राजामौली यांच्या ‘मेरीदा रमण्णा’ या चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटाने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धमाल केली आणि त्यावेळी शाहरुख खानच्या ‘जब तक है जान’ या चित्रपटाला तगडी टक्कर दिली. अशा प्रकारे एस एस राजामौली यांनी या दोन कलाकारांच्या कारकीर्दीला देखील चालना दिली होती.

हेही वाचा :

‘Squid Game’ तब्बल 10 वर्ष करावा लागला होता नकाराचा सामना, आता ठरतेय सर्वाधिक लोकप्रिय सीरीज!

The Kapil Sharma Show : ‘या’ कारणामुळे कपिल शर्मावर रागवला सैफ आली खान, शक्ती कपूरशी होते नाराजीचे कनेक्शन!

Malavika Mohanan : अभिनेत्री मालविका मोहननचे खास फोटो, लोकांना आठवला ‘हा’ आयकॉनिक चित्रपट

कोण होता ‘तो’ व्यक्ती, जो एक गाणं ऐकण्यासाठी रोज लता मंगेशकरांना फोन करायचा! वाचा किस्सा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI