Happy Birthday Swara Bhasker | वादांच्या बाबतीत कंगनालाही देतेय तगडी टक्कर! वाचा अभिनेत्री स्वरा भास्करबद्दल…

आपल्या बेधडक विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या अभिनेत्री स्वरा भास्करचा (Swara Bhasker) आज वाढदिवस आहे. स्वरा भास्कर यंदाच्या वर्षी तिचा 32वा वाढदिवस साजरा करत आहे.

Happy Birthday Swara Bhasker | वादांच्या बाबतीत कंगनालाही देतेय तगडी टक्कर! वाचा अभिनेत्री स्वरा भास्करबद्दल...
स्वरा भास्कर
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 10:22 AM

मुंबई : आपल्या बेधडक विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या अभिनेत्री स्वरा भास्करचा (Swara Bhasker) आज (9 मार्च) वाढदिवस आहे. स्वरा भास्कर यंदाच्या वर्षी तिचा 32वा वाढदिवस साजरा करत आहे. स्वराने बॉलिवूडमध्ये करिअरची सुरूवात ‘गुजारिश’ या चित्रपटातून केली होती. यानंतर स्वराने बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आणि विशेष म्हणजे स्वराने आपल्या बर्‍याच चित्रपटांमध्ये डी-ग्लॅम पात्र साकारली असून, तिने आपल्या प्रत्येक पात्रातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. स्वराची खास बाब म्हणजे ती प्रत्येक विषयावर उघडपणे आणि बेधडकपणे बोलते. याचा कारणामुळे ती सतत चर्चेत येत असते. चला तर, आजच्या या विशेष दिवशी स्वरा आणि वादाचं समीकरण असलेल्या काही गोष्टी जाणून घेऊयात…(Happy Birthday Swara Bhasker most controversial actress of Bollywood)

बेधडक-बिंधास्त स्वरा!

‘वीरे दि वेडिंग’ चित्रपटामधील स्वरा भास्करचा मास्टरबेशन सीन खूप चर्चेत आला होता. या दृश्याबाबत बरेच वादंगही निर्माण झाले. लोक म्हणाले की, हे सर्व आपल्या संस्कृतीत बसत नाहीत. त्यासाठी स्वरालाही ट्रोलही केले गेले होते. मात्र, यावर प्रतिक्रिया देत अभिनेत्रीने सांगितले की, या दृश्याबद्दल आपल्याला बर्‍याच नकारात्मक प्रतिक्रिया मिळतील हे मला आधीपासूनच माहित होते, परंतु हे माझं काम आहे आणि मी ते करणारच!

इतकेच नाही तर, ‘वीरे दि वेडिंग’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान स्वराने पाकिस्तानला अपयशी राज्य म्हटले होते. तिच्या या वक्तव्यानंतर तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यात तिने एका शो दरम्यान पाकिस्तानचे ‘सर्वोत्कृष्ट देश’ म्हणून वर्णन केले आहे.

‘पद्मावत’ पाहून भन्साळींना पत्र!

यानंतर ‘पद्मावत’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी स्वरा भास्कर या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना एक खुले पत्र लिहिले. चित्रपटाच्या जौहर दृश्याबद्दल तिने असे वादग्रस्त विधान केले होते, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. स्वरा म्हणाली की, ‘हे दृश्य पाहून मनात एकच प्रश्न येतो की, पुरुषाला फक्त स्त्रीचे शरीर हवे आहे का? आणि जर स्त्रीला ही मागणी पूर्ण करायची नसेल तर तिला मरण पत्कारालेच पाहिजे का?. स्त्रियांना मरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही का?’

स्वराने एकदा सैन्याबद्दल देखील वादग्रस्त विधान केले होते. स्वराने भारतीय सैनिकांना मूर्ख म्हटले होते, त्यानंतर सोशल मीडियावरील वापरकर्त्यांनी तिची खूप खिल्ली उडवली होती. हेच नाही तर, ट्विटद्वारे स्वराने मॉब लिंचिंग आणि हॉरर किलिंगसारख्या मुद्द्यांवरही आपले मत व्यक्त होते (Happy Birthday Swara Bhasker most controversial actress of Bollywood).

यंदाचा काय प्लॅन?

नुकतेच जेव्हा स्वराला तिच्या वाढदिवसाची योजना काय आहे?, असे विचारले असता ती म्हणाली की, सध्या मी गोव्यात शूट करत असून, मला या चित्रपटाच्या सेटवर राहणे आवडत असल्याने माझ्यासाठी यापेक्षा जास्त आनंददायक दुसरे काही नाही. स्वरा पुढे म्हणाली की, तिला यंदा ‘बिकीनी बॉडी’ बनवायची आहे. त्याचवेळी स्वराला लग्नाच्या योजनांविषयी विचारले असता ती म्हणाली, ‘जेव्हा मला योग्य व्यक्ती मिळेल तेव्हाच मी लग्न करेन. कदाचित या वर्षीही लग्न होऊ शकते.’

स्वरा भास्कर शेवट नेटफ्लिक्सचा कॉमेडी वेब शो ‘भाग बीनी भाग’मध्ये दिसली होती. या शोमध्ये स्वराने स्टँड अप कॉमेडियनची भूमिका केली होती. आता स्वरा ‘शीर कोरमा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात स्वरासोबत अभिनेत्री दिव्या दत्ता मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट एलजीबीटीक्यूआयएवर आधारित असणार आहे.

(Happy Birthday Swara Bhasker most controversial actress of Bollywood)

हेही वाचा :

Rakhi Sawant | ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्राच्या बिकिनी अवतारात दिसली ‘ड्रामा क्वीन’, व्हिडीओ पाहून चाहते म्हणतात…  

Video | कोरोना टेस्ट निगेटिव्ह येताच गोविंदाने भन्नाट स्टाईलमध्ये व्यक्त केला आनंद! पाहा व्हिडीओ…

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.