Kangana Vs Maharashtra Government | महाराष्ट्र लॉकडाऊनवरून कंगनाचा पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा, फोटो ट्विट करत म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. कंगना बर्‍याचदा सोशल मीडियावर महाराष्ट्र सरकारबद्दल वक्तव्य करत असते. या वेळी आता अभिनेत्रीने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारबद्दल ट्विट करत जोरदार हल्लाबोल केला आहे.

Kangana Vs Maharashtra Government | महाराष्ट्र लॉकडाऊनवरून कंगनाचा पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा, फोटो ट्विट करत म्हणाली...
कंगना रनौत आणि उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 5:32 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. कंगना बर्‍याचदा सोशल मीडियावर महाराष्ट्र सरकारबद्दल वक्तव्य करत असते. या वेळी आता अभिनेत्रीने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारबद्दल ट्विट करत जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्यामुळे अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार मुंबईतील कंगनाच्या कार्यालयातील बरेच अनधिकृत बांधकामाची तोडफोड करण्यात आली होता. ज्यानंतर अभिनेत्री सतत उद्धव सरकारवर कडक टीका करत असते. नुकतच कंगनाने ट्विट करत महाराष्ट्रातील लॉकडाऊन बद्दल सडकून टीका केली आहे (Kangana Ranaut  Vs Maharashtra Government on Lockdown).

काहीवेळा पूर्वीच कंगना रनौतने ट्विटवर एका दरवाजाचा फोटो शेअर केला आहे. हा दरवाजा समोरपासून बंद आहे. परंतु, हा दरवाजा सर्व बाजूंनी खुला आहे. हा दरवाजाचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “महाराष्ट्र लॉकडाऊनमध्ये असा आहे”. ज्यानंतर अभिनेत्री सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आली आहे.

‘महाराष्ट्रात कोरोनाचे प्रकरण वाढतच चालले आहेत. ज्यामुळे राज्य सरकारने 15 दिवसांचा लॉकडाऊन लादला आहे. जिथे या संपूर्ण लॉकडाऊनला राज्यात अतिशय मिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. बरेच लोक त्याचे योग्यरित्या अनुसरण करत आहेत, तर काही लोक अजूनही रस्त्यावर फिरत आहेत.

पाहा कंगना रनौतचे ट्विट

 (Kangana Ranaut  Vs Maharashtra Government on Lockdown)

याआधीही कंगनाची टीका

अभिनेत्री कंगना रनौतने गेल्या वर्षी देखील महाराष्ट्राची तुलना पीओकेशी केली होती. ज्यानंतर हा संपूर्ण वाद सुरू झाला आहे. बॉलिवूडच्या अनेक बड्या कलाकारांनीही कंगनाच्या वागण्याला चुकीचे म्हटले आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील शिवसेना सरकारने कंगनाच्या विरोधात मोर्चा बांधला होता. महाराष्ट्र सरकारचे खासदार संजय राऊत देखील कंगनावर नाराज होते. यानंतर बीएमसीने कंगनाच्या घरातील अनधिकृत बांधकामाची तोडफोड केली होती. या सर्वांच्या दरम्यान कंगनाने या लढाईत केंद्र सरकारकडून स्वतःसाठी सुरक्षिततेची मागणी केली आणि तिलाही ही सुरक्षा मिळाली.

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर कंगनाने केली होती टीका

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी 5 एप्रिल रोजी राजीनामा दिला होता. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर अनिल देशमुख यांनी आता आपला राजीनामा सादर केला होता. ही माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना दिली होती. अशा परिस्थितीत बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत (kangana Ranaut) हिने अनिल देशमुख यांच्यावर देखील निशाणा साधला होता.

(Kangana Ranaut  Vs Maharashtra Government on Lockdown)

हेही वाचा :

Kartik Aaryan | करण जोहरशी पंगा, ‘दोस्ताना 2’मधून कार्तिक आर्यनला दाखवला बाहेरचा रस्ता!

Indian Idol 12 | छोट्या पडद्यावर पहिल्यांदाच दिसणार ‘म्युझिकल रामायण’, मोहम्मद दानिश गाणार हनुमान चालीसा!

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.