…म्हणून करण जोहरनं मागितली होती माफी

तसेच नेपोटिझमवरूनही करण जोहर वादात सापडला होता. Karan Johar Big Controversies Of 2020 Nepotism Drugs Flop Film Boycott

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:42 PM, 18 Dec 2020
...म्हणून करण जोहरनं मागितली होती माफी

मुंबईः मुंबईः गेल्या काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या Gunjan Saxena: The Kargil Girl हा चित्रपट वादात सापडला होता. या चित्रपटात हवाई दलाचा अपमान केल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला होता. करण जोहर (Karan Johar) त्या चित्रपटात निर्माता होता, त्यावेळी एका चित्रपटावरून वाद झाला होता. तेव्हा करण जोहरला हवाई दलाला चिठ्ठी लिहून माफी मागावी लागली होती. त्यावेळी अनेक अधिकाऱ्यांनी करण जोहरविरोधात आवाज उठवला होता. तो चित्रपट प्रदर्शित झाला, पण चालला नाही. त्यामुळे निर्माते गुंजन सक्सेनांना दुहेरी संकटांना सामोरं जावं लागलं होतं. एकीकडे हवाई दलाचा आक्रोश सहन करावा लागला, तर दुसरीकडे तो चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चालला नाही. (Karan Johar Big Controversies Of 2020 Nepotism Drugs Flop Film Boycott)

‘त्या’ व्हिडीओवरून झाला होता वाद

चित्रपट निर्माता करण जोहरने होस्ट केलेल्या एका पार्टीत अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. याच पार्टीमधला एका व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता विक्की कौशल, शाहिद कपूर, दीपिका पादुकोण, मलायका अरोरा, अर्जुन कपूर आणि वरुण धवनसह अनेक कलाकार दिसून आले होते.
या पार्टीमध्ये सर्व कलाकारांनी अमली पदार्थांचे सेवन केले असल्याचा दावा शिरोमणी अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांनी केला होता. मनजिंदर सिंह सिरसा यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली होती. त्याचप्रमाणे त्यांनी एनसीबीचे अध्यक्ष राजेश अस्थाना यांची भेट देखील घेतली होती. अर्जुन रामपालची एनसीबीने 16 डिसेंबर रोजी चौकशी केली होती.

त्या पार्टीत ड्रग्स घेतले होते का?

या सर्व प्रकरणात करण जोहरच्या अडकण्याची शक्यता आहे. करणला एनसीबीला सांगावे लागणार की, त्या पार्टीत कोण-कोण अभिनेते आणि अभिनेत्री होते. पार्टी कधी झाली होती? त्या पार्टीत ड्रग्स घेतले होते का? करणने तो व्हिडrओ कोणत्या कॅमेर्‍याचे शूट केला होता? एकूणच करणला एनसीबीला सर्व माहिती द्यावी लागणार आहे. करण जोहरने या व्हिडीओसंदर्भात आधीच स्पष्टीकरण दिले आहे. करणचे म्हणणे आहे की, त्या पार्टीत कोणत्याही प्रकारचे ड्रग्स घेण्यात आले नव्हते. असे आरोप करून आमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, या प्रकरणात आज करण जोहर एनसीबीला काय उत्तर देतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. कारण ड्रग्ज प्रकरणात धर्मा प्रोडक्शन या प्रॉडक्शन कंपनीत काम करणारे दिग्दर्शक क्षितीज प्रसाद यांनाही अटक झाली होती. तथापि, तो जामिनावर बाहेर आहे.

संबंधित बातम्या : 

कमबॅकसाठी करण जोहरच्या पार्टीत जा, क्वान कर्मचाऱ्याची ऑफर, सुचित्रा कृष्णमूर्तीचा खळबळजनक दावा

पांढऱ्या केसांमुळे करण जोहरची थट्टा, वाढदिनी नवा लूक प्रेक्षकांसमोर