Dhamaka | कार्तिक आर्यनच्या ‘धमाका’चे हक्क 135 कोटींना विकले? नेटफ्लिक्सने सांगितले सत्य…

अलीकडेच स्वत: कार्तिकने या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या हक्कांबद्दलची बातमी सर्वत्र चर्चेत आली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:30 AM, 16 Apr 2021
Dhamaka | कार्तिक आर्यनच्या ‘धमाका’चे हक्क 135 कोटींना विकले? नेटफ्लिक्सने सांगितले सत्य...
कार्तिक आर्यन

मुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) आजच्या घडीला एक मोठा स्टार बनला आहे. अभिनेत्याने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीतील अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. कार्तिक आर्यनचा ‘धमाका’ (Dhamaka) हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. कार्तिकचा हा नवीन चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. कार्तिकच्या धमाका चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. आता या चित्रपटाच्या हक्कांबद्दल एक बातमी समोर आली आहे (Kartik Aryan film Dhamaka OTT rights sold for 135 cr know the truth).

अलीकडेच स्वत: कार्तिकने या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या हक्कांबद्दलची बातमी सर्वत्र चर्चेत आली आहे. तेव्हापासूनच चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे की, एखादी ओटीटी कंपनी केवळ 30 कोटींमध्ये बनलेल्या कोरियन चित्रपटाच्या अधिकृत रीमेकसाठी 135 कोटी देऊ शकते का?

नेटफ्लिक्सने सांगितले सत्य

कार्तिकच्या या चित्रपटासाठी नेटफ्लिक्सने 135 कोटी रुपये दिल्याच्या बातम्या सतत येत आहेत. त्यानुसार ओटीटीवरील हा सर्वात महागडा चित्रपट म्हणून याचे वर्णन केले जात होते. आता या बातमीनंतर नेटफ्लिक्सने एक प्रतिसाद सादर केला आहे.

अमर उजालाच्या वृत्तानुसार, नेटफ्लिक्सने या गोष्टी निराधार असल्याचे सांगितले आहे. ‘लव्ह आजकल’च्या फ्लॉपपासून कार्तिक आर्यनवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत. सारा आणि अनन्या यांच्या सोबत अफेअरच्या वृत्तामुळे देखील अभिनेत्याच्या कारकीर्दीवर परिणाम झाला आहे. अमर उजालाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांनी नेटफ्लिक्सला याबद्दल विचारले की, त्यांनी कार्तिकचा आगामी चित्रपट 135 कोटींनी खरेदी केला आहे का?( Kartik Aryan film Dhamaka OTT rights sold for 135 cr know the truth)

यावर, नेटफ्लिक्सने असे म्हटले आहे की, ते केवळ चुकीचे आहे, ही आकडेवारी अजिबात खरी नाही. याद्वारे हे स्पष्ट झाले आहे की, ध्माकाच्या अधिकाराबाबत ज्या गोष्टी समोर आल्या आहेत, त्या केवळ अफवा होत्या. किंवा आपण असे म्हणू शकता की, हा एक पब्लिसिटी स्टंट देखील असावा. चित्रपटाचे एकूण ओटीटी हक्क, त्यातील निम्मेही अद्याप विकले गेले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

कार्तिकने आकारली ‘इतकी’ फी

असे म्हटले जात आहे की, या चित्रपटाची शूटिंग कार्तिक आर्यन याने अवघ्या 10 दिवसात पूर्ण केले आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्याने 20 कोटींची मोबदला घेतला होता. ‘धमाका’ हा चित्रपट कोरियन चित्रपट ‘द टेरर लाईव्ह’चा हिंदी रीमेक आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे, जो चाहत्यांनी खूप आवडला होता.

(Kartik Aryan film Dhamaka OTT rights sold for 135 cr know the truth)

हेही वाचा :

‘आजी’ शर्मिला टागोरने अद्यापही नाही पाहिला ‘छोट्या नवाबा’चा चेहरा, करीना कपूरने सांगितले कारण…

Marathi Serial : ‘आई कुठे काय करते’ मालिकेला नवं वळण, अरुंधतीसमोर आता आणखी एक संकट