Khoya Khoya chand | बॉलिवूडमध्ये एंट्री करताच सुपरहिट ठरली आयशा टाकिया, आता इंडस्ट्रीपासून दूर राहून सांभाळतेय व्यवसाय!

बॉलिवूड हे चमकणाऱ्या ताऱ्यांचे जग आहे, जिथे प्रत्येकाला सर्वात जास्त चमकण्याची इच्छा असते. या झगमगत्या जगात अनेक कलाकार येतात आणि त्यांची स्वतःची ओळख बनवतात. पण असेही काही कलाकार आहेत, जे सुपरहिट ठरले मात्र, नंतर अचानक गायबही झाले. बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकिया (Ayesha Takia) देखील अशाच कलाकारांपैकी एक आहे.

Khoya Khoya chand | बॉलिवूडमध्ये एंट्री करताच सुपरहिट ठरली आयशा टाकिया, आता इंडस्ट्रीपासून दूर राहून सांभाळतेय व्यवसाय!
आयशा टाकिया


मुंबई : बॉलिवूड हे चमकणाऱ्या ताऱ्यांचे जग आहे, जिथे प्रत्येकाला सर्वात जास्त चमकण्याची इच्छा असते. या झगमगत्या जगात अनेक कलाकार येतात आणि त्यांची स्वतःची ओळख बनवतात. पण असेही काही कलाकार आहेत, जे सुपरहिट ठरले मात्र, नंतर अचानक गायबही झाले. बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकिया (Ayesha Takia) देखील अशाच कलाकारांपैकी एक आहे.

आयशा टाकियाने वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी करिअरला सुरुवात केली होती. तिने करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. तिला मॉडेलिंग करताना फाल्गुनी पाठकच्या ‘मेरी चुनर उड जाये’ या गाण्यातून ब्रेक मिळाला होता. या गाण्यानंतर ती ‘शेक इट डॅडी’ या गाण्यात दिसली होती. या काळात इम्तियाज अलीची नजर आयशावर पडली आणि त्याने तिला घेऊन चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. त्याने आयेशाला त्याच्या पहिल्या चित्रपट ‘सोचा ना था’साठी साईन केले होते. आयशाच्या समोर अभय देओल चित्रपटात दिसणार होता. निर्मात्यांच्या अनुपलब्धतेमुळे चित्रपट अडकला. आयशाने या चित्रपटाच्या रिलीजसाठी 3 वर्षे वाट पाहिली पण तो रिलीज होऊ शकला नाही. त्यानंतर आयशाने ‘टारझन : द वंडर कार’द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आयेशाची बॉलिवूड कारकीर्द नुकतीच सुरू झाली होती.

अनेक मोठे चित्रपट हातातून निसटले

आयशाची बॉलिवूड कारकीर्द सुरू झाली होती, पण अनेक मोठे चित्रपटही तिच्या हातातून निसटले होते. आयशाला शाहरुख खानच्या ‘मैं हूं ना’मध्ये अमृता रावची भूमिका ऑफर करण्यात आली होती. पण नंतर तिला या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. माध्यमांच्या अहवालानुसार आयशाला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्याचे खरे कारण म्हणजे तिचा दृष्टिकोन होता. यानंतर आमिर खानचा ‘गजनी’ही आयशाच्या हातून निसटला.

‘डोर’ चित्रपटाचे झाले कौतुक

अनेक चित्रपट हाताबाहेर गेल्यानंतर आयशा ‘डोर’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ती एका राजस्थानी महिलेच्या भूमिकेत दिसली, जिच्या पतीचा मृत्यू झाला होता. प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला. यासोबतच आयशाच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले. ‘डोर’नंतर, आयशा ‘आशा’, ‘नो स्मोकिंग’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली. त्यानंतर ती सलमान खानसोबत ‘वॉन्टेड’मध्ये दिसली. सलमान खानचा ‘वॉन्टेड’ सुपरहिट ठरला.

फरहान आझमीशी बांधली लग्नगाठ

आयेशा पाच वर्षांपासून हॉस्पिटॅलिटी बिझनेसमन फरहान आझमीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ‘वॉन्टेड’चे ​​शूटिंग संपल्यानंतर, तिने फरहान आझमीसोबत लग्न केले.

व्यवसायात पतीला करतेय मदत

आयशा टाकिया सध्या तिच्या पतीला रेस्टॉरंट व्यवसायात मदत करत आहे. आयेशाने 2013मध्ये एका मुलाला जन्म दिला. तिने आपल्या मुलाचे नाव ‘मिखाईल’ ठेवले आहे. मनोरंजन विश्वापासून दूर ती आता तिच्या मुलाची काळजी घेण्यात व्यस्त आहे. तसेच, व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी ती तिच्या पतीला मदत करत आहे.

हेही वाचा :

Kangana Ranaut : जयललिता असत्या तर कंगनाऐवजी ‘या’ अभिनेत्रीला मिळाली असती बायोपिकमध्ये काम करण्याची पहिली संधी

Gautami Deshpande: छबिदार सुरत देखणी, जणू हिरकणी, नार गुलजार… गौतमी देशपांडेचा अस्सल मराठमोळा अंदाज पाहाच!

Sapna Choudhary | आधी अपघाती मृत्यूच्या अफवेची जोरदार चर्चा, आता सपना चौधरीच्या नव्या व्हिडीओमुळे चाहते आनंदी! 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI