Laal Singh Chaddha | ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटातून नागा चैतन्यची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, आमिर खानने केले तोंडभरून कौतुक

आमिरने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही कलाकार आणि क्रू नागा चैतन्यबद्दल बोलताना पाहू शकता. नागा चैतन्यनेही यावेळी चित्रपटातील आपल्या पात्राबद्दल माहिती सांगत आहे. या चित्रपटात नागा चैतन्य आमिर खानच्या मित्राची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात नागाचे नाव बलराजू आहे.

Laal Singh Chaddha | 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटातून नागा चैतन्यची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, आमिर खानने केले तोंडभरून कौतुक
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jul 30, 2022 | 8:30 AM

मुंबई : आमिर खानचा (Aamir Khan) बहुप्रतिक्षित चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आमिर खान अनेक पध्दतीने प्रमोशन करताना दिसतोयं. नुकताच आमिर खान प्रॉडक्शनच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर (Video share) करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यचे पात्र सांगितले आहे. नागा चैतन्य ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करत आहे. या व्हिडिओमध्ये आमिर खान नागा चैतन्यचे कौतुक करत आहे. शुक्रवारी शेअर झालेल्या व्हिडिओमध्ये नागा चैतन्य आणि आमिर खान यांच्यातील पडद्यामागील दृश्ये दाखवण्यात आली आहेत.

आमिर खानने शेअर केला नागा चैतन्यसोबतचा खास व्हिडीओ

आमिरने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही कलाकार आणि क्रू नागा चैतन्यबद्दल बोलताना पाहू शकता. नागा चैतन्यनेही यावेळी चित्रपटातील आपल्या पात्राबद्दल माहिती सांगत आहे. या चित्रपटात नागा चैतन्य आमिर खानच्या मित्राची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात नागाचे नाव बलराजू आहे. त्याचे आजोबा अक्किनेनी नागेश्वर राव यांच्या 1948 मध्ये त्याच नावाच्या चित्रपटातील नाव आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ मधील त्याच्या मिशा देखील दिवंगत अभिनेत्यापासून प्रेरित असल्याचे नागाने सांगितले आहे.

क्रूच्या सदस्यांनी केले नागा चैतन्यचे कौतुक

क्रूच्या काही सदस्यांनी नागा चैतन्यचे कौतुक केले आणि म्हटले की तो एक जेंटलमॅन आहे. त्याच्यासोबत काम करताना खूप आनंद झाला. त्याचवेळी आमिर खानने देखील बोलताना सांगितले की, नागाच्या आई-वडिलांनी आपल्या मुलाचे चांगले संगोपण केले आहे आणि त्याला चांगले संस्कार दिले आहेत. नागा चैतन्यने सांगितले की, तो चित्रपटात अशा प्रकारे गुंतला की ज्यादिवशी त्याचे शेड्यूल संपले, त्या दिवशी तो भावूक झाला आणि सेट सोडू इच्छित नव्हता.
नागा चैतन्य बॉलिवूडमध्ये या चित्रपटातून करणार पदार्पण

हे सुद्धा वाचा

लाल सिंह चड्ढा  चित्रपटात करीना कपूर खान महत्वाच्या भूमिकेत

आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूर खान दिसणार आहे. पण त्याच्याशिवाय नागा चैतन्य देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहे. नागा चैतन्य बॉलिवूडमध्ये या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. हा चित्रपट अद्वैत चंदन यांनी दिग्दर्शित केला आहे, हा चित्रपट 1994 च्या अमेरिकन चित्रपट फॉरेस्ट गंपचा हिंदी रिमेक आहे. आमिर खानचा हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. नागा चैतन्य या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये धडाकेबाज एन्ट्री करणार हे नक्कीच आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें