‘लाइगर’चे नवे पोस्टर रिलीज करून मेकर्सनी दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा…विजय देवरकोंडाचा दमदार लूक पुढे…

पोस्टर रिलीज करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व देशवासियांना अनेक शुभेच्छा असे म्हटले आहे. तसेच त्यांनी लिहिले आहे की लक्षात ठेवा… आम्ही भारतीय आहोत आणि आम्ही लढाऊ आहोत… पुढे त्यांनी चित्रपटाची रिलीज डेट लिहिली आहे.

‘लाइगर’चे नवे पोस्टर रिलीज करून मेकर्सनी दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा...विजय देवरकोंडाचा दमदार लूक पुढे...
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Aug 15, 2022 | 3:08 PM

मुंबई : आज देशात 75 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह दिसतोयं. ‘लाइगर’ (Liger) चित्रपटाच्या निर्मात्यांनीही एका खास पद्धतीने स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आज या चित्रपटाचे नवीन पोस्टर लाँच केले आहे. या पोस्टरसोबत सुपरस्टार विजय देवराकोंडाचा नवा लूकही समोर आलायं. अभिनेत्याचा हा नवा आणि खास लूक चाहत्यांना प्रचंड आवडलेला दिसतोय. धर्मा प्रोडक्शनने (Dharma Productions) या खास दिवशी पोस्टर रिलीज केले आहे. पोस्टरमधील विजय देवरकोंडाचा (Vijay Deverakonda) लूक सर्वांनाच आवडला आहे. त्याचबरोबर यावेळी त्यांच्या दोन्ही हातात तिरंगा आहे. तिरंग्यासोबत अभिनेत्याची जबरदस्त बॉडी आणि सिक्स पॅक अॅब्स लोकांना आवडले आहेत.

इथे पाहा सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट

पोस्टर रिलीज करत मेकर्सनी दिल्या देशवासीयांना शुभेच्छा

पोस्टर रिलीज करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व देशवासियांना अनेक शुभेच्छा असे म्हटले आहे. तसेच त्यांनी लिहिले आहे की लक्षात ठेवा… आम्ही भारतीय आहोत आणि आम्ही लढाऊ आहोत… पुढे त्यांनी चित्रपटाची रिलीज डेट लिहिली आहे आणि म्हटले आहे की, लाइगरला रिलीज होण्यासाठी आता फक्त 10 दिवस शिल्लक आहेत.

‘लाइगर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये विजय देवरकोंडा पदार्पण

विजय देवरकोंडा त्याच्या बहुप्रतिक्षित ‘लाइगर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोयं. या चित्रपटात तो अनन्या पांडेसोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या महिन्यात 25 ऑगस्ट रोजी लाइगर चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज आहे. दोन्ही स्टार्स चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हे दोघे जिथे जातील तिथे त्यांची फॅन फॉलोइंग पाहायला मिळणार आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या यशाबद्दल सर्वांच्याच अपेक्षा वाढल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे प्रमोशनामध्ये व्यस्त

विजय देवरकोंडा आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिहारला गेले होते. त्यांनी पाटण्यात लायगरचे प्रमोशन केले. त्यावेळी त्यांनी भोजपुरी क्वीन अक्षरा सिंहची भेट घेतली. एवढंच नाही तर भोजपुरी भाषेत युपी, बिहारमधील चाहत्यांना आय लव्ह यू म्हटलं. त्याच्या भोजपुरी बोलण्याचं कौतुक करण्यात आलं. लायगरमधून विजयनं आपल्या बॉलिवूड चित्रपटाची सुरुवात केली आहे. या चित्रपटाचे निर्देशक पुरी जगन्नाथ आहेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें