83 The Film | ’83’ चित्रपटातील ‘बिगडने दे’ नवीन गाणे रिलीज, गाण्यात दिसले भारतीय क्रिकेट संघाचे भावविश्व!

83 The Film | '83' चित्रपटातील 'बिगडने दे' नवीन गाणे रिलीज, गाण्यात दिसले भारतीय क्रिकेट संघाचे भावविश्व!
83 the film

कबीर खान दिग्दर्शित, '83' हा निश्चितपणे 2021 च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे, जो भारताच्या 1983 च्या ऐतिहासिक विश्वचषक विजयाभोवती फिरतो. '83' चित्रपटातील गाणी प्रसंगनिष्ठ आहेत आणि चित्रपटाच्या वातावरणाशी अगदी जुळतात.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 14, 2021 | 1:34 PM

मुंबई : कबीर खान दिग्दर्शित, ’83’ हा निश्चितपणे 2021 च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे, जो भारताच्या 1983 च्या ऐतिहासिक विश्वचषक विजयाभोवती फिरतो. ’83’ चित्रपटातील गाणी प्रसंगनिष्ठ आहेत आणि चित्रपटाच्या वातावरणाशी अगदी जुळतात. महत्त्वाकांक्षी क्रीडा नाटकातील प्रेरणादायी गाणे ‘लेहरा दो’ लाँच केल्यानंतर, निर्मात्यांनी अलीकडेच रणवीर सिंग आणि इतर प्रतिभावान कलाकारांच्या ‘बिगडने दे’ चित्रपटातील दुसरे गाणे लॉन्च केले.

बेनी दयाल यांनी गायलेले आणि प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे भारतीय क्रिकेट संघाचे भावविश्व टिपते, जे रणवीर सिंह आणि त्याच्या टीमने उत्तम प्रकारे चित्रित केले आहे. ‘बिगडने दे’ आपल्याला टीम इंडियाची तयारी आणि इतिहास रचण्याआधी पडद्यामागची मजा समोर आणतो.

पाहा गाणे :

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. यासोबतच ताहिर राज भसीन, जीवा, साकिब सलीम, जतिन सरना, चिराग पाटिल, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर, अम्मी विर्क, आदिनाथ कोठारे, धैर्य करवा, आर बद्री आणि पंकज त्रिपाठी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दीपिका पादुकोण या चित्रपटात कपिल देव यांची पत्नी रोमीची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

3D मध्ये रिलीज होणार चित्रपट!

रिलायंस एंटरटेनमेंट आणि फँटम फिल्म्स यांच्याद्वारे कबीर खान फिल्म्स प्रोडक्शनच्या ‘83’ला सादर करण्यात येणार आहे. रिलायंस एंटरटेनमेंट आणि ‘पीवीआर पिक्चर्स’चा हा चित्रपट 24 डिसेंबर 2021ला हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड़ आणि मलयाळममध्ये 3डी रिलीज होणार आहे.

कमल हसन यांची राजकमल फिल्म्स इंटरनेशनल, अक्किनेनी नागार्जुन यांची अन्नपूर्णा स्टूडियो, पृथ्वीराज प्रोडक्शंस यांनी चित्रपटाचे अनुक्रमे तामिळ, तेलुगु आणि मलयाळम व्हर्जनकरिता रिलायंस एंटरटेनमेंट सोबत एकत्र आले आहेत. पृथ्वीराज प्रोडक्शन आणि किच्छा सुदीपा यांची शालिनी आर्ट्स फिल्म मलयाळम आणि कन्नड व्हर्जन प्रस्तुत करण्यासाठी तयार आहेत. चित्रपटाची निर्मिती दीपिका पादुकोण, कबीर खान, विष्णु वर्धन इंदुरी, साजिद नाडियाडवाला, फैंटम फिल्म्स, रिलायंस एंटरटेनमेंट यांनी मिळून केली आहे.

हेही वाचा :

Vicky-Ankita Wedding | ‘आज मेरे यार की शादी है..’ अंकिता लोखंडे-विकी जैनच्या संगीत सोहळ्याला कंगनाने लावले चार चांद!

Happy Birthday Rana Daggubati | फोटोग्राफीचे व्यवसायिक शिक्षण, अभिनयच नव्हे ‘या’ क्षेत्रातही राणा दग्गुबाती अव्वल!

Happy Birthday Sameera Reddy | आई झाल्यानंतर नैराश्यात गेली, आता मनोरंजन विश्वापासून दूर राहतेय समीरा रेड्डी!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें