83 Teaser Out : भारतीय क्रिकेटमधील ऐतिहासिक क्षणाची झलक, रणवीर सिंहच्या ‘83’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!

अभिनेता रणवीर सिंह (Rnveer Singh) स्टारर चित्रपट ‘83’ चा (83 The Film) टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. हा चित्रपट कधी चित्रपटगृहात दाखल होणार याची सर्वांनाच प्रतीक्षा होती. चित्रपटगृहे सुरु झाल्यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली.

83 Teaser Out : भारतीय क्रिकेटमधील ऐतिहासिक क्षणाची झलक, रणवीर सिंहच्या ‘83’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!
83 the film
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 12:17 PM

मुंबई : अभिनेता रणवीर सिंह (Rnveer Singh) स्टारर चित्रपट ‘83’ चा (83 The Film) टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. हा चित्रपट कधी चित्रपटगृहात दाखल होणार याची सर्वांनाच प्रतीक्षा होती. चित्रपटगृहे सुरु झाल्यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. आता याचा एक छोटासा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा टीझर भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात सुंदर आठवणीची एक छोटीशी झलक सादर करत आहे. हा टीझर पाहिल्यानंतर तुम्ही देखील त्या दिवसांच्या आठवणींमध्ये हरवून जाल, जेव्हा भारताने पहिल्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकला होता.

आज (26 नोव्हेंबर) सकाळी रिलायन्स एंटरटेनमेंटच्या यूट्यूब चॅनलवरून रणवीर सिंहच्या ’83’ चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. 59 सेकंदांच्या या टीझरमध्ये क्रिकेटच्या मैदानाची झलक पाहायला मिळाली आहे. जिथे भारताचा सामना दाखवला आहे, ज्यात भारताने इतिहास रचला होता. स्टेडियममध्ये प्रचंड गर्दी असून, सामना एका रोमांचक वळणावर असल्याचे टीझरमध्ये दिसत आहे. मग, फलंदाज चेंडूला जोरदार टोलवतो आणि 2 खेळाडू चेंडूला पकडण्याचा प्रयत्न करतात, त्यापैकी एक रणवीर सिंह आणि दुसरा जतिन सरना आहे. दोघेही जवळ येताच टीझर संपतो. टीझरमध्ये दाखवण्यात आलेल्या या एका सीनमुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

पाहा टीझर :

भारताने पहिल्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकला, त्याच कथेवर आधारित ‘83’ हा चित्रपट आहे. हा चित्रपट 1983च्या विश्वचषकात भारताच्या संघर्षाची आणि विजयाची कथा दाखवणार आहे. चित्रपटासाठी सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे. यासोबतच त्या विश्वचषक संघाचा भाग असलेल्या माजी क्रिकेटपटूंचीही मदत घेण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खान यांनी केले आहे. या चित्रपटावर जवळपास 3 वर्षे काम सुरू होते, आता तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मल्टीस्टारर चित्रपट

या चित्रपटात अनेक कलाकार काम करत आहेत. रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, हार्डी संधू, ताहिर भसीन, एमी विर्क, पंकज त्रिपाठी, साकिब सलीम, चिराग पाटील, धैर्य करवा, जतिन सरना आणि बोमन इराणी हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 83 हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘83’ चित्रपट 24 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकताच त्याचा टीझर भेटीला आला आहे, तर ट्रेलर 30 नोव्हेंबर 2021 रोजी रिलीज होणार आहे.

हेही वाचा :

‘त्यांनी मालिका सोडली वाईट आम्हाला वाटलं, पण असं…’, अन्नपूर्णा विठ्ठल यांच्या आरोपांवर सुनिल बर्वेंची प्रतिक्रिया

Antim : The Final Truth Review | ‘मुळशी पॅटर्न’ इतकाच मसाला सोबत सलमान भाईची दमदार अ‍ॅक्शन, वाचा कसा आहे ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.