Liger Movies | विजय देवरकोंडाचा जबरदस्त लूक, लाइगर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण!

विजय देवरकोंडा यांच्या 'लाइगर' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत, त्यानंतर आता अभिनेत्याने चित्रपटाचे पोस्टर रिलीज करून त्याची रिलीज डेटही जाहीर केली आहे. साऊथ अभिनेता विजयने नुकतीच त्याच्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने चाहत्यांना आपला चित्रपटातील लूक दाखवला आहे.

Liger Movies | विजय देवरकोंडाचा जबरदस्त लूक, लाइगर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण!
Image Credit source: इंस्टाग्राम
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jul 02, 2022 | 2:23 PM

मुंबई : साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) सध्या त्याच्या बॉलिवूड डेब्यूमुळे प्रचंड चर्चेत आहे. विजय त्याच्या बहुप्रतिक्षित ‘लाइगर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नुकताच विजयचा एक खास लूक समोर आला आहे. विजयचा हा खास लूक (Luke) बघितल्यानंतर चाहत्यांना आश्चर्य वाटले आहे. अभिनेता विजयने त्याचा लेटेस्ट लुकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. विजयचा हा खास लूक त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. विजय लाइगर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करणार आहे.

इथे पाहा विजयचे ट्विट

लाइगर चित्रपटातून विजय करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

विजय देवरकोंडा यांच्या ‘लाइगर’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यानंतर आता अभिनेत्याने चित्रपटाचे पोस्टर रिलीज करून त्याची रिलीज डेटही जाहीर केली आहे. साऊथ अभिनेता विजयने नुकतीच त्याच्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने चाहत्यांना आपला चित्रपटातील लूक दाखवला आहे. तसेच, त्यांनी लिहिले आहे की त्यांचा आगामी चित्रपट लाइगर 25 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

विजय देवसकोंडाने ट्विट शेअर करत चाहत्यांना दिली माहिती

विजय देवसकोंडा यांनी आगामी ‘लाइगर’ या चित्रपटाविषयी आपल्या चाहत्यांना अपडेट दिले होते. अभिनेत्याने तो येत असल्याचे एक ट्विट शेअर केले होते. त्यावरून चाहत्यांनी अंदाज लावला की तो त्याच्या लाइगर चित्रपटाबद्दल बोलत आहे. विजयचा लाइगर चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे.

हे सुद्धा वाचा

चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर

विजयचा बहुचर्चित बॉलिवूड डेब्यू लाइगर या वर्षी रिलीज होणार आहे. ज्याची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट यावर्षी 25 ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विजयसोबत अनन्या पांडेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करत आहे. हा चित्रपट आता काय कमाल करेल हे बघण्यासारखे आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें