सारा अली खानचा ‘ऐ वतन… मेरे वतन’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…

'ऐ वतन... मेरे वतन' हा सारा अली खानचा चित्रपट याच महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची घटना सत्य घटनेतून प्रेरित असल्याचे सांगण्यात येतंय.

सारा अली खानचा 'ऐ वतन... मेरे वतन' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला...
Follow us
| Updated on: Oct 05, 2022 | 10:57 AM

मुंबई : नुकताच सारा अली खानने (Sara Ali Khan) एक व्हिडिओ शेअर करून आगामी ‘ऐ वतन… मेरे वतन’ या चित्रपटाची घोषणा केलीये. 1942 मधील भारत छोडो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा काल्पनिक कथावर आधारित चित्रपट आहे. विशेष म्हणजे सारा या चित्रपटामध्ये (Movie) स्वातंत्र्यसैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. साराने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर वरुणचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये या चित्रपटाबद्दल माहिती देताना वरुण धवन (Varun Dhawan) दिसतोय. साराने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

इथे पाहा सारा अली खानने शेअर केलेली पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

‘ऐ वतन… मेरे वतन’ हा सारा अली खानचा चित्रपट याच महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची घटना सत्य घटनेतून प्रेरित असल्याचे सांगण्यात येतंय. गेल्या काही दिवसांपासून सारा अली खान बाॅलिवूडच्या अनेक हीट चित्रपटांमध्ये काम करते आहे. साराच्या चाहत्या वर्गाची संख्या देखील अत्यंत मोठी आहे.

सारा अली खानने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये वरुण धवन एका वेगळ्याच स्टाईलमध्ये दिसतोय. सुरूवातीला या चित्रपटाबद्दल माहिती तो त्याच्या स्टाईलमध्ये सांगतो आणि त्यानंतर तो साराच्या स्टाईलमध्ये माहिती सांगताना दिसतोय. त्यानंतर चित्रपटाची माहिती या व्हिडीओमध्ये दिसते. वरुणचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. चित्रपटाचे लेखन दरब फारुकी आणि कन्नन अय्यर यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी केलीये.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.