शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने मुंबई पोलिसांवर लावले अत्यंत गंभीर आरोप, म्हणाला की फक्त….

काही दिवसांपूर्वी राज कुंद्राला पोर्नोग्राफी चित्रपटांची निर्मिती आणि वितरण केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती, त्यानंतर जामिनावर राज कुंद्राची सुटका झालीये.

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने मुंबई पोलिसांवर लावले अत्यंत गंभीर आरोप, म्हणाला की फक्त....
Raj kundra
Follow us
| Updated on: Sep 30, 2022 | 10:56 AM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा याने चक्क आता मुंबई पोलिसांवर अत्यंत मोठे आणि गंभीर आरोप केले आहेत. पॉर्नोग्राफी आणि अश्लील चित्रपटांच्या प्रकरणात राज कुंद्राने हे आरोप केले आहेत. इतकेच नव्हे तर राज कुंद्राने (Raj Kundra)  यासंदर्भात थेट सीबीआयला पत्र लिहिले असून याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी देखील केलीये. राज कुंद्राने मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप केले असून सीबीआयला दिलेल्या पत्रामध्ये या अधिकाऱ्यांची नावे देखील लिहिली आहेत. राज कुंद्राच्या या पत्रामुळे आता मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

काही दिवसांपूर्वी राज कुंद्राला पोर्नोग्राफी चित्रपटांची निर्मिती आणि वितरण केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती, त्यानंतर जामिनावर राज कुंद्राची सुटका झालीये. राज कुंद्राने केलेल्या या आरोपांमुळे आता अनेक चर्चांना उधाण आले असून सीबीआय याप्रकरणी आता काय भूमिका घेते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

राज कुंद्राने असा दावा केला आहे की, एका बड्या व्यावसायिकाच्या सांगण्यावरून मुंबई पोलिसांनी हा कट रचत मला अटक केली आणि पॉर्नोग्राफीच्या प्रकरणात अडकले आहे. राज कुंद्राने फक्त सीबीआयलाच पत्र लिहिले नसून न्यायासाठी थेट पंतप्रधान कार्यालयाला देखील पत्र पाठवले आहे. राज कुंद्राने त्याचा पत्रामध्ये म्हटले आहे की, पॉर्न फिल्म आणि त्याचा काहीच संबंध नाहीये.

मुंबई पोलिसांच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी कट रचत मला फसवले आहे. राज कुंद्राने आपल्या पत्रात मुंबई पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांची नावे देखील लिहिले आहेत, ज्यांनी हा कट रचला होता. राज कुंद्राचे म्हणणे आहे की, एका व्यावसायिकाच्या सांगण्यावरून मुंबई पोलिसांनी हे सर्व केले असून या व्यावसायिकाचे मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांसोबत अत्यंत जवळचे संबंध आहेत.

Non Stop LIVE Update
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.