Liger | विजय देवरकोंडाच्या ‘लायगर’ची झलक प्रेक्षकांना आवडली! आणखी एका विक्रमाला गवसणी!

Liger | विजय देवरकोंडाच्या ‘लायगर’ची झलक प्रेक्षकांना आवडली! आणखी एका विक्रमाला गवसणी!
विजय देवरकोंडा

दक्षिण भारताचा सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याच्या 'लायगर' (Liger) या बहुचर्चित चित्रपटाची पहिली झलक गेल्या वर्षीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबर रोजी प्रेक्षकांना नवीन वर्षाची भेट म्हणून सादर करण्यात आली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jan 04, 2022 | 1:52 PM

मुंबई : दक्षिण भारताचा सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याच्या ‘लायगर’ (Liger) या बहुचर्चित चित्रपटाची पहिली झलक गेल्या वर्षीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबर रोजी प्रेक्षकांना नवीन वर्षाची भेट म्हणून सादर करण्यात आली. या व्हिडीओमध्ये दर्शकांना MMA फाईट सिक्वेन्स, तसेच ‘स्लम डॉग ऑफ द स्ट्रीट्स ऑफ मुंबई’ आणि ‘चाय वाले’ यांच्या संघर्षाची झलक पाहायला मिळते.

आता या व्हिडीओने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन पुरी जगन्नाध यांनी केले आहे आणि करण जोहर, चार्मे कौर यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटाने पॅन इंडियातील अनेक रेकॉर्ड तोडले. Liger च्या या व्हिडीओने आगामी पॅन इंडिया फिल्म्ससाठी 24 तासांत विक्रमी व्ह्यूजसह एक नवीन बेंचमार्क सेट केला आहे.

नवा विक्रम!

Glimpse of Liger ने अवघ्या 7 तासात 16 दशलक्ष व्ह्यूजसह मागील सर्व सर्वोत्तम रेकॉर्ड मोडले आहेत. आता हा व्हिडीओ 25 दशलक्ष व्ह्यूजसह एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे.  हा व्हिडीओ YouTube वर ट्रेंड करत आहे. या चित्रपटात अनन्या पांडेही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

या व्हिडीओमध्ये, विजय, एक दक्षिण भारतीय अभिनेता, दोन लहान परंतु प्रभावी संवाद देखील उच्चारतो. ‘आम्ही भारतीय आहोत’, हा त्याचा संवाद देशाप्रती असलेले त्याचे प्रेम दर्शवित आहे. आणि दुसरे म्हणजे, ‘वाट लगा देंगे’ हा संवाद चित्रपटातील त्याची आक्रमक वृत्ती आणि धाडसी व्यक्तिरेखा स्पष्ट करतो.

दिग्दर्शक पुरी जगन्नाध यांनी या बहुप्रतिक्षित पॅन इंडिया प्रकल्पात विजय देवरकोंडा याला खास स्टायलिश आणि अॅक्शन अवतारात दाखवले आहे. त्याने आक्रमकपणे विजयचे पात्र वेगळ्या आणि ट्रेंडी लूकसह बदलले आहे, त्याच्या मेकओव्हरने सर्वांनाच थक्क केले आहे.

बॉक्सरच्या भूमिकेत

हा एक बिग बजेट चित्रपट आहे आणि निर्मात्यांसह त्याचे चाहतेही चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहतायत. टिझरलाच एवढ्या मोठ्या प्रमाणात लाइक केलं जातंय, सिनेमा तर हीट होणारच, अशी सर्वांना अपेक्षा आहे. तो बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करेल, असं बोललं जातंय. या चित्रपटात त्यानं जगप्रसिद्ध बॉक्सर माइक टायसनसोबत बॉक्सिंगही केलीय. बॉलिवूडमध्ये बॉक्सिंगवर आधारित अनेक चित्रपट असले तरी हा चित्रपट त्या सर्व बॉक्सिंग चित्रपटांपेक्षा वेगळा आहे.

दिग्गज बॉक्सर माईक टायसनही मुख्य भूमिकेत

या चित्रपटाच्या चर्चेचे एक प्रमुख कारण म्हणजे दिग्गज बॉक्सर माईक टायसन. तो पहिल्यांदाच भारतीय चित्रपटात काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात तो विजयच्या प्रतिस्पर्ध्याच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा आणि माइक टायसन यांच्याशिवाय अनन्या पांडे, रम्या कृष्णन, रोनित रॉय आणि मकरंद देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विजय देवरकोंडा या चित्रपटात बॉक्सरच्या भूमिकेत आहे. त्याची पहिली झलक नुकतीच आली असून ती प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी पुरेशी आहे.

हेही वाचा :

स्वप्नील जोशीने नवीन वर्षातील नवीन चित्रपटाची केली घोषणा, ‘अश्वत्थ’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!

जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रियादेखील कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती!

Khatija | वाढदिवशीच खातिजा अडकली खास नात्यात!, पाहा कोण आहे ए आर रहमानचा होणारा जावई Riyasdeen?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें