Vicky-Katrina | विकी कौशल आणि कतरिना कैफ लग्नासाठी जयपूरला रवाना
विकी आणि कतरिनाच्या लग्नासाठी रॉयल स्टाइल मंडप तयार केला जात आहे, जो संपूर्णपणे काचेचा असेल. लग्नाची थीम पेस्टल आहे. लग्नात मोबाईल फोनवर बंदी घालण्यात येणार असून या हायप्रोफाईल लग्नासाठी बाऊन्सर ठेवण्यात येणार आहेत.
मुंबई : विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी रविवारी रात्री कायदेशीररित्या रजिस्टर पद्धतीने लग्न केले. स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार लग्न केल्यानंतर विकी आणि कतरिना जयपूरसाठी रवाना झाले आहेत. चाहत्यांच्या नजरा सध्या विकी आणि कतरिनाच्या हालचालींवरही लागल्या आहेत. दोघेही 9 डिसेंबरला लग्न करणार आहेत. मात्र अद्याप दोघांकडूनही त्यांच्या लग्नाबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. पण जयपूरमध्ये कतरिना आणि विकीसह तिच्या कुटुंबीयांची उपस्थिती त्यांच्या लग्नाच्या बातमीला पुष्टी देते.
‘असे’ आहे कार्यक्रमाचे नियोजन
विकी आणि कतरिनाने त्यांच्या रॉयल वेडिंगसाठी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्सेसचा किल्ला निवडला आहे. किल्ला दिव्यांनी सजवण्यात आला आहे. या रॉयल वेडिंगचे संगीत 7 डिसेंबरला होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफ आणि विकी कौशल एकमेकांसाठी संगीतावर खास परफॉर्मन्स देणार आहेत. याशिवाय कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळीही खास परफॉर्मन्स देणार आहेत. या संगीतात नेहा कक्कर आणि रोहनप्रीत देखील आपल्या अभिनयाने ठसा उमटवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यानंतर 8 डिसेंबर रोजी मेहंदीचे आयोजन करण्यात येणार आहे. सोजत मेहंदी सेलिब्रिटींची आवडती असून त्याची किंमत सुमारे एक लाख रुपये आहे. या मेहंदीसाठी मोठी ऑर्डर देण्यात आली आहे. 9 डिसेंबर रोजी लग्नाचे आयोजन केले जाणार आहे, ज्यामध्ये इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध व्यक्ती पोहोचणार आहेत.
लग्नात मोबाईल फोनवर बंदी
विकी आणि कतरिनाच्या लग्नासाठी रॉयल स्टाइल मंडप तयार केला जात आहे, जो संपूर्णपणे काचेचा असेल. लग्नाची थीम पेस्टल आहे. लग्नात मोबाईल फोनवर बंदी घालण्यात येणार असून या हायप्रोफाईल लग्नासाठी बाऊन्सर ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय सलमान खानचा बॉडीगार्ड शेराची टीम लग्नासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करणार आहे. (Vicky Kaushal and Katrina Kaif leave mumbai for Jaipur for their wedding)