अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकराला अटक, तब्बल 7 महिन्यांनी बेड्या

सिनेअभिनेत्री सेजल शर्मा आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी तिचा प्रियकर आदित्य वशिष्ठ याला अटक केली आहे (Boyfriend arrest in Actress Sejal Sharma Suicide Case).

अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकराला अटक, तब्बल 7 महिन्यांनी बेड्या
Follow us
| Updated on: Aug 22, 2020 | 8:23 PM

ठाणे : सिनेअभिनेत्री सेजल शर्मा आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी तिचा प्रियकर आदित्य वशिष्ठ याला अटक केली आहे (Boyfriend arrest in Actress Sejal Sharma Suicide Case). त्याला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्यावर प्रेयसी सेजल शर्माला फसवल्याचा आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. आदित्य वशिष्ट दिल्लीतील एक जीम इंस्ट्रक्टर आणि मॉडेल आहे.

सेजल कृष्णकुमारी शर्मा (वय 26) मिरारोड पूर्वमधील रॉयल नेस्ट बिल्डिंगमध्ये राहत होती. तिने जानेवारीमध्ये घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यानंतर पोलिसांनी तिचा प्रियकर आदित्य वशिष्ठ (30) याला तपासासाठी बोलावलं होतं. मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सेजल शर्माच्या आईने देखील पोलिसांकडे तक्रार केली होती. अखेर पोलिसांना त्याच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने मिरारोड पोलिसांनी आदित्य वशिष्टला अटक केली.

न्यायालयात हजर केले असता आरोपी आदित्य वशिष्ट याला न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेजल शर्माचा मृतदेह 24 जानेवारी रोजी तिच्या मिरा रोड येथील घरात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला होता. त्या दिवशी सेजलचं केवळ आदित्य वशिष्टशी बोलणं झालं होतं.

या प्रकरणी सेजलच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन एप्रिलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. यात तिच्या आईने आदित्य वशिष्टने सेजलला तिच्या अडचणी सोडवण्याचं आश्वासन देऊन फसवल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्यने सेजलसोबतचं नातं ज्या दिवशी तोडलं त्याच दिवशी सेजलने आत्महत्येचं पाऊल उचललं.

संबंधित बातम्या :

‘दिल तो हैप्पी है जी’ सिरियलमधील अभिनेत्रीची आत्महत्या

Bollywood Celebrities | 2020 च्या सहा महिन्यात मनोरंजन विश्वाने गमावले 20 हिरे!

Boyfriend arrest in Actress Sejal Sharma Suicide Case

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.