75व्या ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ला सुरुवात झाली असून मंगळवारी संध्याकाळी या फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवरील लूक सोशल मीडियावर पोस्ट होऊ लागले. यंदा कानमध्ये परीक्षकपदी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची (Deepika Padukone ) निवड झाली आहे, त्यामुळे तिच्या खास लूकची चाहत्यांना उत्सुकता होती. मात्र दीपिकाने यावेळी चाहत्यांची निराशा केली.
1 / 5
प्रसिद्ध फॅशन डिझायरन सब्यसाची मुखर्जीने डिझाइन केलेली साडी तिने रेड कार्पेटसाठी नेसली होती. मात्र साडीवरील मेकअप नेटकऱ्यांना काही पसंत पडला नाही.
2 / 5
एवढी सुंदर साडी असताना त्यावर इतका भयंकर मेकअप का केलाय, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. काहींनी तिला चांगल्या मेकअप आर्टिस्टची गरज आहे, असंही म्हटलंय.
3 / 5
दीपिकाने रेड कार्पेटसाठी रेट्रो लूक करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न मेकअपच्या बाबतीत पुरता फसल्याचं दिसून येत आहे. तिच्या डोळ्यांवर काळ्या आयशॅडोवरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
4 / 5
17 मे पासून कान फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली असून 28 मे रोजीच्या गाला सेरेमनीमध्ये परीक्षक विजेत्यांची नावं जाहीर करणार आहेत.