सोनाक्षी सिन्हा 24 लाख रुपये घेऊनही स्टेज शोला आलीच नाही, फसवणुकीचा गुन्हा दाखल

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) अडचणीत सापडली आहे. सोनाक्षी सिन्हावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनाक्षी सिन्हा 24 लाख रुपये घेऊनही स्टेज शोला आलीच नाही, फसवणुकीचा गुन्हा दाखल

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) अडचणीत सापडली आहे. सोनाक्षी सिन्हावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये सोनाक्षीवर 24 लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी आणि सोनाक्षीच्या चौकशीसाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी सोनाक्षीच्या मुंबईच्या घरी हजेरी लावली. मात्र सोनाक्षी घरी नसल्याने त्यांना रिकाम्या हाती परतावं लागलं.

काय आहे प्रकरण?
सोनाक्षीला 13 सप्टेंबर 2018 रोजी एक स्टेज शोमध्ये परफॉर्म करायचा होता. त्यासाठी सोनाक्षीला 24 लाख रुपये देण्यात आले होते. मात्र या इव्हेंटला सोनाक्षी पैसे घेऊनही आलीच नाही. त्यामुळे आयोजकांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे उत्तर प्रदेशात तिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर मुरादाबाद पोलीस गुरुवारी सोनाक्षीच्या जबाबासाठी मुंबईत दाखल झाले. पोलिसांनी सोनाक्षीच्या घरी हजेरी लावली, मात्र त्यावेळी ती घरात नव्हती. सोनाक्षी सिन्हा मुंबईतील जुहू इथं राहते, त्यामुळे यूपी पोलिसांनी जुहू पोलिसांचीही मदत घेतली. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार सोनाक्षीच्या जबाबासाठी पोलीस आजही तिचं दार ठोठावू शकतात.


दरम्यान, सोनाक्षीवरील सर्व आरोप खोटे असल्याचं स्पष्टीकरण तिच्या मॅनेजमेंटने दिले आहे. सोनाक्षीची प्रतिमा मलिन करण्याचा हा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.

सोनाक्षी दबंग 3 मध्ये व्यस्त
सोनाक्षी सिन्हा सध्या सलमान खानच्या दबंग 3 या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा पुढील वर्षी रिलीज होणार आहे. याशिवाय सोनाक्षीचा ‘खानदानी शफाखाना’ हा सिनेमा 2 ऑगस्ट 2019 रोजी रिलीज होणार आहे. शिवाय तिचा ‘मिशन मंगल’ हा सिनेमा 15 ऑगस्ट 2019 रोजी भेटील येत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *