अजय देवगणच्या सिनेमातील 'या' सीनवर सेन्सॉर बोर्डाची कात्री

मुंबई : अभिनेता अजय देवगण, रकुल प्रीत आणि तबू यांचा दे दे प्यार दे हा सिनेमा 17 मे रोजी रिलीज होतोय. या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने तीन कट्ससह मंजुरी दिली. सिनेमातील एका गाण्यात अभिनेत्री रकुल प्रीतच्या हातात दारुची बॉटल होती. या सीनवर सेन्सर बोर्डाने कात्री लावली आहे. या जागी दुसरं काही तरी दाखवण्याचं सुचवण्यात आलंय. तीन …

अजय देवगणच्या सिनेमातील 'या' सीनवर सेन्सॉर बोर्डाची कात्री

मुंबई : अभिनेता अजय देवगण, रकुल प्रीत आणि तबू यांचा दे दे प्यार दे हा सिनेमा 17 मे रोजी रिलीज होतोय. या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने तीन कट्ससह मंजुरी दिली. सिनेमातील एका गाण्यात अभिनेत्री रकुल प्रीतच्या हातात दारुची बॉटल होती. या सीनवर सेन्सर बोर्डाने कात्री लावली आहे. या जागी दुसरं काही तरी दाखवण्याचं सुचवण्यात आलंय.

तीन कट्सनंतर सिनेमाला 7 मे रोजी यू/ए प्रमाणपत्र देण्यात आल्याचं सेन्सॉर बोर्डाने अधिकृत वेबसाईटवर स्पष्ट केलंय. या गाण्यात बॉटलच्या जागी फुलांचा गुच्छ देऊन तो सीन रिप्लेस केला जाऊ शकतो, असा सल्ला सेन्सॉर बोर्डाला देण्यात आला होता. अखेर हा सल्ला स्वीकारण्यात आला.

सिनेमातील वड्डी शराबन या गाण्यात अभिनेत्री हातात दारुची बॉटल घेऊन नृत्य करत आहे. त्यामध्ये दारुची बॉटल डिलीट करुन त्याजागी अभिनेत्रीच्या हातात फुलांचा गुच्छ रिप्लेस करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. आणखी दोन दृष्यांवरही कात्री चालवण्यात आली आहे.

VIDEO :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *