'ठाकरे' चित्रपटानंतर आता 'ठाकरे' सिक्वल येणार!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवसैनिकांपासून अनेक चाहत्यांनी  ठाकरे चित्रपटाच्या पहिल्या भागाला चांगला प्रतिसाद दिला होता.

balasaheb thackeray movie squall, ‘ठाकरे’ चित्रपटानंतर आता ‘ठाकरे’ सिक्वल येणार!

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवसैनिकांपासून अनेक चाहत्यांनी  ‘ठाकरे’ चित्रपटाच्या पहिल्या भागाला चांगला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता लवकर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निर्मितीत ‘ठाकरे’ चित्रपटाचा सिक्वल तयार करण्यात येणार आहे.

‘ठाकरे’ चित्रपटाचा पहिला भाग 25 जानेवारी 2019 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अनेकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला होता. या चित्रपटात शिवसेना स्थापनेपासून ते राज्यात युतीची सत्ता येण्यापर्यंतच्या प्रमुख घटना दाखवण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता लवकरच ठाकरे चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात राजकारणात झालेला उदय, त्यानंतर झालेली पक्षातील बंड यासह अनेक प्रमुख घटना प्रेक्षकांसमोर आणली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सध्या संजय राऊत हे ‘ठाकरे’ सिक्वल बरोबर दिवंगत माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट ‘जॉर्ज’, तर मुंबई पोलीस दलातील कर्तृत्वान निवृत्त पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्या कामगिरींवर आधारित  चित्रपटाची निर्मिती संजय राऊत करीत आहेत. या सर्व चित्रपटांची निर्मिती राऊत इंटरटेनमेंट यांच्या माध्यामातून केली जाणार आहे.

तसेच ठाकरे चित्रपटाच्या सिक्वलमध्ये कलाकारांची संपूर्ण वेगळी टीम असणार आहे. विशेष म्हणजे ‘ठाकरे’ सिक्वलच्या दिगदर्शनाची धुरा मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या आणि बॉलिवूडमध्ये वावर असलेल्या दिग्ददर्शकाकडे देण्यात येणार आहे.

दरम्यान या तिन्ही चित्रपटाच्या निर्मितीसाठी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट टीमशी संपर्क आणि बोलणी सुरू आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *