KBC 11 | जन्मताच डॉक्टरांकडून मृत घोषित, सावित्रीच्या लेकीसमोर बिग बी अवाक

कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी झालेल्या उत्तर प्रदेशच्या नुपूर सिंगला डॉक्टरांनी जन्मतःच मृत घोषित केलं होतं. मात्र आयुष्यात काहीतरी करुन दाखवण्याच्या इर्षेने नुपूरने धडपड करुन इथवर मजल मारली

KBC 11 | जन्मताच डॉक्टरांकडून मृत घोषित, सावित्रीच्या लेकीसमोर बिग बी अवाक
Follow us
| Updated on: Aug 29, 2019 | 3:34 PM

मुंबई : कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati – KBC 11) च्या अकराव्या पर्वात प्रेक्षकांना स्पर्धकांच्या अंगावर काटा आणणाऱ्या कहाण्या ऐकायला मिळत आहेत. उत्तर प्रदेशातील नुपूरची प्रेरणादायी कथा ऐकून अमिताभ बच्चनही (Amitabh Bachchan) अचंबित झाले. जन्मतः दिव्यांग असलेल्या नुपूर सिंहने (Noopur Singh) या कार्यक्रमात साडे बारा लाखांचं बक्षीस पटकावलं.

उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यामधल्या बिघापूरची रहिवासी असलेली नुपूर सिंह. तिच्या धडपडीची कहाणी सुरु झाली तिच्या जन्मासोबतच. डॉक्टरांनी नुपूर जन्मतःच मृत असल्याची घोषणा केली. आई-वडिलांनी टाहो फोडला, तितक्यात एका नातेवाईकाला चिमुकल्या बाळाची हालचाल जाणवली. डॉक्टरांना बोलावलं आणि नुपूर ‘जिवंत’ झाली.

नुपूरच्या जन्मानंतर डॉक्टरांनी दाखवलेली हलगर्जी तिला चांगलीच महागात पडली. तिच्या पदरी आयुष्यभराचं दिव्यांगत्व आलं. मात्र त्यापुढे हार मानेल, तर ती नुपूर कसली. नियतीपुढे झुकणं तिला मान्य नव्हतं. तिचा लढा सुरु झाला, तिची धडपड सुरु झाली.

नुपूरचे वडील रामकुमार सिंह शेतकरी, तर आई कल्पना गृहिणी. साहजिकच नुपूरचं आयुष्य ऐशोआरामचं नव्हतं.

नुपूर लहानपणापासूनच हुशार आणि कष्टाळू होती. बारावीत ती गुणवत्ता यादीत झळकली होती. बीएडची प्रवेश परीक्षा पहिल्या झटक्यात पार करण्याचं स्वप्न तिने पूर्ण केलं. आता तर ती दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देते.

केबीसी बघण्याची आवड तिला होतीच. सहभागी स्पर्धकाच्या आधीच ती प्रश्नांची अचूक उत्तरं देते, असं तिची आई अभिमानाने सांगते.

29 वर्षांच्या संघर्षानंतर नुपूर पोहचली अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर. बारा प्रश्नांची अचूक उत्तरं देत नुपूरने 12 लाख 50 हजार रुपये जिंकले. संघर्ष पाचवीलाच पूजलेला असताना त्यावर मात करण्याच्या जिद्दीनेच या सावित्रीच्या लेकीने हे यश कमावलं.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.