दीपिकाचा 'छपाक' अडचणीत, कॉपीराईट प्रकरणी गुन्हा दाखल

एका चित्रपट निर्मात्याने 'छपाक' सिनेमाच्या टीमविरोधात कॉपीराईट नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. राकेश भारती असं या चित्रपट निर्मात्याचं नाव आहे.

Deepika Padukone Chhapak movie, दीपिकाचा ‘छपाक’ अडचणीत, कॉपीराईट प्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई : बॉलिवूडच्या सर्वात सुंदर आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक दीपिका पादुकोण सध्या तिच्या आगामी ‘छपाक’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे (Deepika Padukone Chhapak movie). दीपिकाचे तमाम चाहते तिच्या या सिनेमाची आतूरतेने वाट पाहत आहेत. मात्र, दीपिकाचा हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच अडचणीत सापडला आहे. एका चित्रपट निर्मात्याने ‘छपाक’ सिनेमाच्या टीमविरोधात कॉपीराईट नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. राकेश भारती असं या चित्रपट निर्मात्याचं नाव आहे.

राकेश भारती यांनी मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालयात दीपिका पादुकोण, दिग्दर्शक आणि सिनेमाचे निर्माते यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राकेश भारती यांनी न्यायालयाला दिलेल्या लिखित तक्रारीत या लोकांविरोधात कडक कारवाई करण्याची विनंती केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राकेश भारतीने दावा केला आहे की, त्यांनी त्यांच्या मुलासोबत मिळून अॅसिड अटॅक पीडितेच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्याचा प्लान केला होता. इतकंच नाही तर त्यांनी 2015 मध्ये या सिनेमाच्या कथेला ‘ब्लॅक डे’ या नावाने रजिस्टर्डही केलं होतं, असं त्यांनी सांगितलं. त्यांनी या चित्रपटाबाबच एश्वर्या राय, कंगना राणावत यांसारख्या अभिनेत्रींशी तसेच, फॉक्स स्टार स्टुडिओजशी चर्चाही केली होती. त्यांनी या चित्रपटाच्या कहाणीची स्क्रिप्ट कॉपी फॉक्स स्टार स्टूडियो, केए प्रोडक्शन आणि मृगा फिल्म्सच्या ऑफिसमध्येही दिली होती, असा दावा राकेश भारतीने केला.

मात्र, हे लोक माझ्या कंटेटवर चित्रपट बनवत आहेत, हे मला नंतर माहित झालं. त्यांनी माझ्या स्क्रिप्टमध्ये थोडाफार बदल करुन ‘छपाक’ चित्रपट बनवला, असा आरोप राकेश भारती यांनी केला.

छपाक

दीपिकाचा ‘छपाक’ हा चित्रपट अॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर आधारित आहे. यामध्ये दीपिका साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचं नाव ‘मालती’ आहे. या चित्रपटात दीपिकासोबत अभिनेता विक्रांत मस्सी लीड रोलमध्ये दिसत आहे.
मालतीची भूमिका ही दीपिकाच्या करिअरमधली सर्वात आव्हानात्मक भूमिका असल्य़ाचं म्हटलं जात आहे. लग्नानंतर प्रदर्शित होणारा दीपिकाचा हा पहिलाच चित्रपट आहे.

‘छपाक’ हा चित्रपट 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच अजय देवगन-काजोल यांच्या ‘तान्हाजी’ चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर छपाकची टक्कर (Chhapaak Official Trailer) होईल. या चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजारने केलं आहे.

कोण आहे लक्ष्मी अग्रवाल?

‘छपाक’ सिनेमा लक्ष्मी अग्रवाल या अॅसिड हल्ला पीडितेच्या जीवनावर आधारित आहे. लक्ष्मीवर 2005 मध्ये एका तरुणाने अॅसिड फेकले होते. लग्नासाठी नकार दिल्याने लक्ष्मीवर अॅसिड हल्ला करण्यात आला होता. मात्र या हल्ल्यानंतर न खचता लक्ष्मीने कायद्याने लढाई दिली. लक्ष्मीमुळे स्थानिक दुकानात अॅसिड, केमिकलच्या विक्रीवर बंदी आणणारा कायदा भारतात लागू करण्यात आला.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *