‘पीएम नरेंद्र मोदी’ सिनेमाबाबत कोर्टाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या सिनेमाचं प्रदर्शन थांबवण्यात यावं, अशी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळली. मुख्य न्यायाधीश राजेंद्र मेनन आणि न्यायमूर्ती अनूप जयराम भामभानी यांच्या खंडपिठाने वकिल सुजीत कुमार सिंग यांची ही याचिका फेटाळून लावली. या याचिकेत वकिल सुजीत कुमार […]

‘पीएम नरेंद्र मोदी’ सिनेमाबाबत कोर्टाचा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या सिनेमाचं प्रदर्शन थांबवण्यात यावं, अशी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळली. मुख्य न्यायाधीश राजेंद्र मेनन आणि न्यायमूर्ती अनूप जयराम भामभानी यांच्या खंडपिठाने वकिल सुजीत कुमार सिंग यांची ही याचिका फेटाळून लावली. या याचिकेत वकिल सुजीत कुमार सिंग यांनी आचार संहिता लागू झाल्याने या सिनेमाचे प्रदर्शन थांबवण्यात यावे अशी मागणी केली होती.

या सिनेमाचा ट्रेलर आणि गाणी प्रदर्शित होताच हीट झाली. मोदींचा पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास कसा होता, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. मोदींच्या याच प्रवासाची एक झलक ‘पीएम नरेंद्र मोदी’ या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने या सिनेमाची वाट पाहत आहेत. हा सिनेमा येत्या 5 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. मात्र, याच्या प्रदर्शनाची तारीख बदलू शकते. जर असं झालं, तर ऐन लोकसभा निवडणुकांवेळी हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येईल.

‘पीएम नरेंद्र मोदी’ सिनेमाच्या अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये मोदींच्या जीवनातील वेगवेगळे टप्पे आणि महत्त्वाच्या घटना दाखवण्यात आल्या आहेत. एक चहाविक्रेत्या ते भारत देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतचा मोदींचा प्रवास यात दाखवण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये मोदींच्या पंतप्रधान पदापर्यंच्या प्रवासात येणाऱ्या अडचणी आणि पंतप्रधान झाल्यावर उद्भवलेले वाद, त्यातून मार्ग काढत पुढे जाणारे मोदी दाखवण्यात आले आहे.

अभिनेता विवेक ओबेरॉयची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केलं आहे. विवेक ओबेरॉयने अत्यंत उत्कृष्ट मोदी साकारले आहेत. तो मोदींच्या लूकला पूर्णपणे न्याय देण्यात यशस्वी ठरला आहे. विवेक ओबेरॉयसोबतच या सिनेमात बोमन इराणी, इरीना बहाव, बरखा बिष्ट, मनोज जोशी, प्रशांत नारायणन यांसारखे कलाकार दिसणार आहेत. बोमन इराणी यात रतन टाटा यांच्या भूमिकेत असणार आहेत,  तर मनोज जोशी हे अमित शाह यांची भूमिका साकारत आहेत. हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.