दीपिका-रणवीरच्या पार्टीत सगळ्यांचं लक्ष दिशा पटाणीकडे

मुंबई : बॉलिवूडचं फेमस कपल दीपिका आणि रणवीरने मुंबईत सेलिब्रिटींसाठी स्पेशल रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात दोघेही खुश दिसत होते. दीपिकाने स्माईल देत पती रणवीरच्या हातात हात घालून रिसेप्शनमध्ये एंट्री केली. यावेळी दोघांनीही मीडियासमोर फोटोसाठी वेगवेगळ्या पोज दिल्या. पण या पार्टीत सगळ्यात जास्त चर्चा होती ती म्हणजे अभिनेत्री दिशा पटाणीची. स्टायलिश आऊटफिटमध्ये आलेल्या दिशा …

disha patani, दीपिका-रणवीरच्या पार्टीत सगळ्यांचं लक्ष दिशा पटाणीकडे

मुंबई : बॉलिवूडचं फेमस कपल दीपिका आणि रणवीरने मुंबईत सेलिब्रिटींसाठी स्पेशल रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात दोघेही खुश दिसत होते. दीपिकाने स्माईल देत पती रणवीरच्या हातात हात घालून रिसेप्शनमध्ये एंट्री केली. यावेळी दोघांनीही मीडियासमोर फोटोसाठी वेगवेगळ्या पोज दिल्या. पण या पार्टीत सगळ्यात जास्त चर्चा होती ती म्हणजे अभिनेत्री दिशा पटाणीची.

स्टायलिश आऊटफिटमध्ये आलेल्या दिशा पटाणीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. कॅमेऱ्यासमोर जेव्हा तिने पोज दिली, तेव्हा तिचे फोटो घेण्यासाठी फोटोग्राफर्समध्ये चढाओढ दिसून आली. दिशा पटाणीसोबत तिचा कथित बॉयफ्रेंड आणि अभिनेता टायगर श्रॉफही होता.

disha patani, दीपिका-रणवीरच्या पार्टीत सगळ्यांचं लक्ष दिशा पटाणीकडे

दीपविरच्या या पार्टीला बॉलिवूडमधील दिग्गजांनी हजेरी लावली. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यापासून ते बॉलिवूडमधील नवोदित कलाकारांसह सर्व जण या पार्टीत उपस्थित होते.

दीपिका आणि रणवीरचं इटलीत लग्न झाल्यानंतर भारतातलं हे दुसरं रिसेप्शन होतं. एक रिसेप्शन 21 नोव्हेंबरला बंगळुरुत झालं, तर 28 नोव्हेंबरला मुंबईत रिसेप्शन झालं. या रिसेप्शननंतर मुंबईतल्या पार्टीची चाहत्यांना मोठी प्रतिक्षा होती.

दीपिका आणि रणवीरने 14 आणि 15 नोव्हेंबरला इटलीतील प्रसिद्ध लेक कोमो इथे लग्न केलं. दीपिका दक्षिण भारतीय असल्यामुळे 14 तारखेला कोंकणी पद्धतीने, तर 15 तारखेला सिंधी पद्धतीने शाही विवाह सोहळा झाला.

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाची धामधूम सुरु आहे. दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचं वारं वाहत असतानाच देसी गर्ल प्रियांचा चोप्राही नीक जॉनससोबत विवाहबंधनात अडकली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *