आदित्य ठाकरेंसोबतच्या डिनरबाबत चर्चा, दिशा पटाणी म्हणते…

अभिनेत्री दिशा पटनी नेहमी आपल्या स्टाईल आणि बोल्ड फोटोमुळे चर्चेत असते. पण यंदा दिशा पटनी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत असल्याचे दिसत आहे.

आदित्य ठाकरेंसोबतच्या डिनरबाबत चर्चा, दिशा पटाणी म्हणते...
Follow us
| Updated on: Jun 13, 2019 | 11:53 PM

मुंबई : अभिनेत्री दिशा पटनी नेहमी आपल्या स्टाईल आणि बोल्ड फोटोमुळे चर्चेत असते. पण यंदा दिशा पटनी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत असल्याचे दिसत आहे. दिशाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. यामध्ये ती युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेसोबत दिसत आहे. हे दोघंही डीनरसाठी गेले होते, असं म्हटलं जात आहे. आदित्य ठाकरे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आहे. दिशा आणि आदित्य एकत्र दिसल्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडालेली आहे आणि यामुळे दिशाला ट्रोल करण्यात आले आहे. मात्र दिशाने यावर ट्रोलर्सला आक्रमकपणे उत्तर दिले आहे.

“दिशाने ट्रोलर्सला प्रश्न विचारला आहे की, एक मुलगा आणि मुलगी लंच किंवा डिनर डेटसाठी जाऊ शकत नाहीत का? मी एखादी व्यक्ती स्त्री आहे की पुरुष आहे पाहून मैत्री करत नाही. प्रत्येकाचे स्त्री आणि पुरुष मित्र असतात”, असं दिशा म्हणाली.

दिशा पटनी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या नात्याबद्दल सर्व जगाला माहित आहे. आतपर्यंत अनेकदा दोघं एकत्र डिनरसाठी गेले आहेत. पण दोघंही आपल्या नात्याबद्दल एक शब्दही काढत नाहीत. तर दिशाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होते की, “टायगर माझा खास मित्र आहे”.

“मी असे प्रोफेशन निवडले आहे की, ज्यामध्ये नेहमीच माझ्यावर लक्ष दिलं जाते. मी नेहमी माझ्या मनाप्रमाणे वागते आणि मला लोकांच्या बोलण्याने काही फरक पडत नाही”, असं दिशा म्हणाली”.

दिशा पटनी आदित्यसोबत डिनरला गेल्यामुळे अने युजर्सला ही गोष्ट पटलेली नाही. काही युजर्सने म्हटले, ‘एक था टायगर’. एका युजर्सने म्हटले ‘टायगर जिंदा है?’ दिशा पटनी आणि आदित्य ठाकरेचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी दिशाने ऑरेंज कलरचा टॉप घातला आहे आणि डेनिक स्कर्ट घातलेला आहे, तर आदित्य नेहमीप्रमाणे कॅज्युअलमध्ये होता.

दरम्यान, दिशा, सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटात दिसली होती. ती लवकरच ‘मंगल’मध्ये ही दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सूरी करत आहेत. चित्रपटात दिशा शिवाय अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर आणि कुणार खेमू दिसणा आहेत. चत्रपट पुढच्यावर्षी प्रदर्शित होणार आहे.

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.