बॉलिवूडमध्ये स्टार किड्सची चलती, त्यांच्याबद्दल तुम्हाला ‘हे’ माहितंय का?

मुंबई : फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करताच या स्टार किड्सला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच, बॉलिवूडमध्ये या नवीन कलाकारांच्या सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहेत. त्यासोबतच या कलाकारांना सोशल मीडियावर फॉलो करणारा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळेच बॉलिवूडमधील नवोदित स्टार अन्यना पांडे, सारा अली खान आणि ईशान खट्टर यांनी आपला पहिला चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच दुसरा चित्रपट …

बॉलिवूडमध्ये स्टार किड्सची चलती, त्यांच्याबद्दल तुम्हाला ‘हे’ माहितंय का?

मुंबई : फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करताच या स्टार किड्सला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच, बॉलिवूडमध्ये या नवीन कलाकारांच्या सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहेत. त्यासोबतच या कलाकारांना सोशल मीडियावर फॉलो करणारा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळेच बॉलिवूडमधील नवोदित स्टार अन्यना पांडे, सारा अली खान आणि ईशान खट्टर यांनी आपला पहिला चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच दुसरा चित्रपट साईन केला होता. बॉलिवूडचे नवीन कलाकार सध्या आपला डेब्यू चित्रपट रिलीजपेक्षा आपला दुसरा चित्रपट साईन करण्यात जास्त व्यस्त दिसत आहे.

बॉलिवूडमधील सर्वात लहान वयाची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून अनन्या पांडेचे नाव घेतले जाते. अनन्या ही अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी आहे. सध्या अनन्या आपल्या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. लवकरच ‘स्टुडंट ऑफ द ईयर 2’ चित्रपटातून अनन्या आपल्या समोर येणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटातून ती आपल्या करिअरची सुरुवात करणार आहे. मात्र डेब्यू चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच, अनन्या कार्तिक आर्यनसोबत ‘पती पत्नी और वो’ चित्रपटात झळकणार आहे, अशी चर्चा सध्या बॉलीवूडविश्वात सुरु झाली आहे.

“एखादा मोठा प्रॉडक्शन हाऊस अभिनेत्याची चाहत्यावर्गात असलेली पसंती, उत्साह आणि त्याचे काम पाहून त्याला लाँच करतो. मी हे अनन्या आणि तारामध्ये पाहिले आहे. त्यामुळे मला त्यांच्या पहिल्या चित्रपटमध्ये कास्ट करण्यासाठी काही अडचण नाही झाली”, असं निर्माते भूषण कुमार यांनी सांगितले.

ईशान खट्टरने डेब्यूआधी ‘बियॉन्ड द क्लाउड्स’ चित्रपट साईन केला होता आणि सारा अली खाननेही ‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ चित्रपट साईन केले होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *