सिद्धार्थ मल्होत्रासमोर कुत्र्याचा रॅम्पवॉक, मॉडेलही चक्रावल्या

मुंबई : डिझायनर रोहित बालच्या फॅशन शोला अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री डायना पेंटी यांनी हजेरी लावत रॅम्पवॉक केला. पण या शोमध्ये खरा हिरो ठरला तो एक कुत्रा. हा कुत्रा स्टेजवर आला, सर्वांचं लक्ष वेधलं आणि रॅम्पवॉक करत निघून गेला. यामुळे काही वेळासाठी स्टेजवर असलेल्या मॉडेलही चक्रावून गेल्या. या शोचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर …

सिद्धार्थ मल्होत्रासमोर कुत्र्याचा रॅम्पवॉक, मॉडेलही चक्रावल्या

मुंबई : डिझायनर रोहित बालच्या फॅशन शोला अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री डायना पेंटी यांनी हजेरी लावत रॅम्पवॉक केला. पण या शोमध्ये खरा हिरो ठरला तो एक कुत्रा. हा कुत्रा स्टेजवर आला, सर्वांचं लक्ष वेधलं आणि रॅम्पवॉक करत निघून गेला. यामुळे काही वेळासाठी स्टेजवर असलेल्या मॉडेलही चक्रावून गेल्या.

या शोचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कुत्रा स्टेजवर येतो, रॅम्पवॉकसाठी उभ्या असलेल्या पाच मॉडेलच्या जवळ जातो. नंतर स्टेजवर फेरफटका मारतो आणि सिद्धार्थ मल्होत्रासमोरुन स्टेजच्या खाली येतो. बाऊन्सरने या कुत्र्याला पकडण्याचाही प्रयत्न केला.

कुत्रा स्टेजवर आल्याने सिद्धार्थ मल्होत्राचं लक्ष विचलित झालं नाही. कुत्रा निघून गेल्यानंतर सिद्धार्थने रॅम्पवॉक केला. सिद्धार्थचा गुरुवारी वाढदिवसही होता. बाऊन्सर येत असल्याचं पाहताच या कुत्र्याने स्टेज सोडलं, पण थोड्या वेळातच त्याने सर्व प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *