डॉली चायवाला याची खतरनाक मागणी, हैराण करणारे आरोप, एका शोसाठी तब्बल…
डॉली चायवाला हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. डॉली चायवाला याचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. हेच नाही तर डॉली चायवाला अगदी कमी कालावधीमध्ये खूप जास्त प्रसिद्ध झालाय. डॉली चायवाला याची चहा पिण्यासाठी लोक विदेशातून भारतात येतात.
डॉली चायवाला हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारा विषय आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंगसाठी भारतात आलेले मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हे थेट नागपूरचा डॉली चायवाला याचा चहा पिण्यासाठी त्याच्या टपरीवर पोहोचले. बिल गेट्स आणि डॉली चायवाला यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. डॉली चायवाला हा अत्यंत खास पद्धतीने चहा बनवतो आणि आपल्या ग्राहकांना देतो. मात्र, त्याची चहा तयार करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. अत्यंत कमी दिवसांमध्ये डॉली चायवाला हा खूप प्रसिद्ध झालाय. लोक विदेशातूनही डॉली चायवाल्याचा चहा घेण्यासाठी स्पेशल येत आहेत.
डॉली चायवाला आता एक सेलिब्रिटी बनला आहे. डॉली चायवाला कोणत्याही शोमध्ये जाण्यासाठी मोठी फीस घेतो. आता नुकताच डॉली चायवाला याच्याबद्दल हैराण करणारा खुलासा करण्यात आलाय. यानंतर लोकांना मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. डॉली चायवाला याच्याबद्दल हा खुलासा कुवेती फूड व्लॉगरने केलाय.
AK Food Vlog च्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या फूड व्लॉगरने डॉली चायवाला याच्याबद्दल हा खुलासा केलाय. त्याने म्हटले की, मला डॉली चायवाला याला कुवेतला बोलवायचे होते. मी डॉली चायवाला याला फोन केला. त्या व्यक्तीच्या मागण्या ऐकून मलाच मोठा धक्का बसला. फूड व्लॉगर फखरूद्धीन याने म्हटले की, तो डॉली चायवाला एका शोसाठी तब्बल 5 लाख रूपये फीस घेतो.
View this post on Instagram
हेच नाही तर त्याला 5 स्टार किंवा 4 स्टार हॉटेलचे बुकिंग पाहिजे. यासोबतच त्याच्यासोबत एक व्यक्तीही असणार त्याचीही सर्व व्यवस्था करायची. त्याने खरोखरच हेच सांगितले मला फोनवर. मी माझी ओळख सांगूनही तो मला बोलला नाही तर त्याचा मॅनेजर बोलला. पाच लाख रूपये फीस ही फक्त एका दिवसाची असणार हे देखील मला सांगण्यात आले.
डॉली चायवाला याच्याबद्दलच्या हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ आतापर्यंत 2 कोटी लोकांनी बघितला आहे. या व्हिडीओनंतर प्रश्न विचारला जातोय की, खरोखरच डॉली चायवाला हा इतकी जास्त फीस घेतो? मात्र, याबद्दल अजूनही डॉली चायवाला याच्याकडून काहीच खुलासा हा करण्यात नाही आला. डॉली चायवाला याची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.