KBC 12 | अवघ्या एक रुपयात 35 वर्षे रुग्णसेवा, पद्मश्री डॉ. रविंद्र आणि स्मिता कोल्हे ‘केबीसी 12’च्या मंचावर!

महाराष्ट्रातील पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे आणि पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे हे दांपत्य गेल्या 35 वर्षांपासून वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत.

KBC 12 | अवघ्या एक रुपयात 35 वर्षे रुग्णसेवा, पद्मश्री डॉ. रविंद्र आणि स्मिता कोल्हे ‘केबीसी 12’च्या मंचावर!
Follow us
| Updated on: Dec 01, 2020 | 11:42 AM

मुंबई :केबीसी 12’च्या (KBC 12) ‘कर्मवीर’स्पेशल भागात या आठवड्यात अमिताभ बच्चन यांच्यासह जेष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. रविंद्र कोल्हे (Dr. Ravindra Kolhe) आणि त्यांच्या पत्नी पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे (Dr. Smita Kolhe) विराजमान होणार आहेत. जिथे डॉक्टर रूग्णांकडून उपचार शुल्क म्हणून हजारो रुपयांची फी आकारतात, तिथे महाराष्ट्रातील ही डॉक्टर जोडी रूग्णांवर केवळ एका रुपयात उपचार करते. कुठल्याही मोबदल्याचा विचार न करता केवळ समजाप्रति आपली कर्तव्ये पार पडणाऱ्या डॉ. रविंद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे यांचा ‘केबीसी 12’च्या मंचावर सन्मान होणार आहे (Dr. Ravindra Kolhe and Dr. Smita Kolhe participate in KBC 12 Karmaveer Special episode).

महाराष्ट्रातील पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे आणि पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे हे दांपत्य गेल्या 35 वर्षांपासून वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत. डॉ. कोल्हेंनी एमबीबीएस अभ्यासाच्या शेवटच्या दिवसांतच रुग्ण सेवेचे व्रत घेतले होते. आयुष्यात आपल्याला समाजातील तळागाळातल्या व्यक्तींपर्यंत पोहोचावे लागेल आणि त्यांच्यावर उपचार करावे लागतील, असे त्यांनी आधीच ठरवले होते.

(Dr. Ravindra Kolhe and Dr. Smita Kolhe participate in KBC 12 Karmaveer Special episode).

मेळघाटचा प्रवास

अडीच महिने अनेक ठिकाणी भटकल्यानंतर ते अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या वैरागड गावात पोहोचले. वैरागडमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना मुख्य जिल्ह्यापासून 25 किमी बसने प्रवास करावा लागला होता. तर, पुढचे 30 किमी अंतर पायी चालत जावे लागले होते.

मेळघाटातील या दुर्गम प्रदेशात बहुतेक आदिवासी लोक राहतात. या लोकांना योग्य आरोग्य सेवा मिळावी यासाठी डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीने मेळघाटातच राहण्याचा निश्चय केला (Dr. Ravindra Kolhe and Dr. Smita Kolhe participate in KBC 12 Karmaveer Special episode).

पुरस्काराच्या रकमेचा समाजासाठी वापर

केवळ पद्मश्रीच नव्हे तर, स्मिता आणि रविंद्र कोल्हे यांना त्यांच्या समाज कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. 2011मध्ये त्यांना रोख रक्कम दहा लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला होता. या पुरस्काराची रक्कम देखील त्यांनी समाज उपयोगी कामासाठी वापरली. 10 लाखांची ही रक्कम त्यांनी गावात ऑपरेशन थिएटर सुरू करण्यासाठी वापरली. या पती-पत्नी दोघांनीही कठोर परिश्रम करून बर्‍याच लोकांवर उपचार केले.

शेती विषयक कामे

स्मिता आणि रविंद्र कोल्हे केवळ इथल्या लोकांवर उपचार करण्यापुरतेच मर्यादित राहिले नाहीत. या सगळ्यांतून एक पाऊल पुढे टाकत, त्यांनी शेतीकडेही लक्ष दिले आहे. याबाबत बोलताना डॉक्टर म्हणतात, ‘जेव्हा खेड्यातील लोक चांगले व पोटभरून अन्न खातील, तेव्हाच त्यांना आजार होण्याचा धोका संभवणार नाही.’

डॉ. स्मिता कोल्हे यांनी अमिताभ बच्चन यांना अभिमानाने सांगितले की, ‘बऱ्याच समस्यांमुळे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे आपलेच खूप नुकसान झाले आहे. परंतु, मेळघाटात आतापर्यंत एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही.’ ‘केबीसी 12’च्या मंचावर त्यांच्या या समाज कार्याचा गौरव केला जाणार आहे.

(Dr. Ravindra Kolhe and Dr. Smita Kolhe participate in KBC 12 Karmaveer Special episode)

Non Stop LIVE Update
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.