Drugs Case | ड्रग्ज प्रकरणी करिश्मा प्रकाशच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण, निर्णयाची प्रतीक्षा!

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात 27 ऑक्टोबर रोजी करिश्मा प्रकाश हिच्या घरावर धाड टाकली होती.

Drugs Case | ड्रग्ज प्रकरणी करिश्मा प्रकाशच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण, निर्णयाची प्रतीक्षा!
करिष्मा प्रकाश ही अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर आहे.
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 5:58 PM

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात (Drugs Case) अडकलेली दीपिका पदुकोणची माजी मॅनेजर करिश्मा प्रकाश (Karishma Prakash) हिच्या जामीन अर्जावर कोर्ट गुरुवारी (12 नोव्हेंबर) निकाल देणार आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी करिश्मा प्रकाश हिच्या घरी 27 ऑक्टोबर रोजी धाड टाकली होती. या धाडीत 1.7 ग्रॅम हॅश हे ड्रग्स आणि सीबीडी ऑइलच्या दोन बाटल्या सापडल्या होत्या. याबाबत एनसीबी अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. तर, करिश्मा प्रकाशने कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. यावर आता कोर्ट काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे (Drugs Case hearing on Karishma Prakash Bail Application).

करिश्माच्या घरात ड्रग्जचा साठा

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात 27 ऑक्टोबर रोजी करिश्मा प्रकाश हिच्या घरावर धाड टाकली होती. या धाडीत त्यांना 1.7 ग्रॅम हशीष ड्रग्ज आणि भारतात बंदी असलेल्या सीबीडी ऑइलच्या (CBD Oil) 2 बाटल्या सापडल्या होत्या. याबाबत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात करिश्माला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत 27 ऑक्टोबर रोजी समन्स देण्यात आले होते. तसेच 28 ऑक्टोबर रोजी हजर राहण्यासाठी सांगण्यात आले होते. मात्र,करिश्मा चौकशीसाठी हजर राहिली नाही. उलट तिने 29 ऑक्टोबर रोजी मुंबई सेशन कोर्टात धाव घेतली.

मुंबई सेशन कोर्टात 3 नोव्हेंबरला तिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने शनिवारपर्यंत (7 नोव्हेंबर) करिश्माला अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, करिश्माला चौकशीसाठी एनसीबीचे अधिकारी बोलवतील तेव्हा हजर रहावे लागणार आहे. 7 नोव्हेंबर रोजी कोर्ट करिश्माच्या अटकपूर्व जामीन अर्जावर अंतिम निर्णय देणार होते. मात्र, या प्रकरणावर सुनावणी पूर्ण झाली नव्हती. ही सुनावणी आज (11 नोव्हेंबर) पूर्ण झाली आहे. आता कोर्ट आपला निकाल उद्या (12 नोव्हेंबर) देणार आहे.(Drugs Case hearing on Karishma Prakash Bail Application)

करिश्माचा राजीनामा

करिश्माच्या घरात ड्रग्ज आढळल्याने एनसीबीने तिला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी दोन वेळा समन्स पाठविला होता. मात्र, दोनदा समन्स पाठवूनही करिश्मा या चौकशीला हजर राहिली नाही. यामुळे एनसीबीने तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, करिश्मा गेल्या काही दिवसांपासून गायब असल्याचा दावा केला जात होता. अखेरीस ती स्वतःहून एनसीबीसमोर हजर झाली होती. यानंतर पुन्हा एकदा एनसीबीच्या चौकशीत अडकण्याची भीती वाटल्याने दीपिकाने तिला थेट कामावरूनच काढून टाकले. करिश्माने स्वतःहून राजीनामा दिला असला तरी दीपिकानेच तिला काढल्याची चर्चा रंगली आहे.

(Drugs Case hearing on Karishma Prakash Bail Application)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.