Drugs Case | भारती सिंह-हर्ष लिंबाचियाचा जामीन रद्द करा, एनसीबीची न्यायालयाकडे मागणी

ड्रग्ज प्रकरणात भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी एनसीबीने विशेष एनडीपीएस न्यायालयात केली आहे.

Drugs Case | भारती सिंह-हर्ष लिंबाचियाचा जामीन रद्द करा, एनसीबीची न्यायालयाकडे मागणी
Follow us
| Updated on: Dec 02, 2020 | 11:34 AM

मुंबई : कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. सध्या ते दोघेही जामिनावर (Bail) तुरुंगाबाहेर आहेत. तर, दुसरीकडे ड्रग्ज प्रकरणात भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी एनसीबीने (NCB) विशेष एनडीपीएस न्यायालयात केली आहे (Drugs Case NCB Seeking cancellation of Bail of Bharti Singh And Haarsh Limbachiyaa).

भारती आणि हर्षच्या घरात 86.5 ग्रॅम गांजा जप्त केल्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी त्या दोघांनाही अटक करण्यात आली होती. यानंतर प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर दंडाधिकारी न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर केला होता. भारती आणि हर्षचा जामीन रद्द करण्यात यावा अशी मागणी एनसीबीने केली. याबरोबरच त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याऐवजी चौकशीसाठी एनसीबीच्या ताब्यात सोपवण्यात यावे, अशी मागणी देखील केली आहे. न्यायालयाने मंगळवारी या संदर्भात भारती आणि हर्षला नोटीस पाठवली असून, या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण?

एनसीबीने 21 नोव्हेंबर रोजी खार दांडा येथे कारवाई केली होती. या ठिकाणाहून एका 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याकडे 15 बॉटल एल. एस. डी. हे ड्रग आणि 40 ग्राम गांजासह नेट्राझेपम हे ड्रग्स स्वरूपातील औषध ही सापडले आहे. या ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या व्यक्तीच्या चौकशीत कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष यांचे नाव उघडकीस आले.

यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी भारती हिच्या घरी धाड टाकली असता, तिच्या घरी 86.5 ग्राम गांजा सापडला. भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष या दोघांनीही ते गांजा घेत असल्याची कबुली दिली होती. यानंतर भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाला एनडीपीएस कायद्यानुसार अटक करण्यात आली होती (Drugs Case NCB Seeking cancellation of Bail of Bharti Singh And Haarsh Limbachiyaa).

अटकेनंतर कोर्टासमोर हजर केले असता दोघांनाही 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दोघांवरही कंसंप्शनचे चार्जेस लावण्यात आले आहेत. एनडीपीएस कायदा 1985, कलम 20 अ, 20 ब 2 आणि 27 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनीही जामिनासाठी किल्ला कोर्टात अर्ज दाखल केला होता. त्या जामीन अर्जाला मंजुरी मिळाली असून, सध्या ते जामिनावर बाहेर आहेत.

भारतीच्या सोसायटीत बॉलिवूडचे दिग्गज

भारती सिंह, पती हर्ष लिंबाचिया समवेत मुंबईच्या प्रसिद्ध ओबेरॉय स्प्रिंग या इमारतीत राहते. भारतीसह या सोसायटीत आयुष्मान खुराना, विकी कौशल, श्रुती हसन हे बडे कलाकर देखील याच इमारतीत वास्तव्यास आहेत. तर, भारतीचे सहकलाकार कृष्णा अभिषेक आणि कपिल शर्मा देखील याच इमारतीत राहतात.

(Drugs Case NCB Seeking cancellation of Bail of Bharti Singh And Haarsh Limbachiyaa)

संबंधित बातम्या : 

Drugs Case | कॉमेडियन भारती सिंहसह हर्षला 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; सोमवारी जामिनावर सुनावणी होणार!

अभिनेता अर्जुन रामपालच्या घरावर एनसीबीची धाड, वाहनचालक पोलिसांच्या ताब्यात

Non Stop LIVE Update
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.