सावळी दिसत असल्याने आलियाच्या बहिणीला फोटोग्राफरने बाहेर काढलं

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:44 PM, 1 May 2019

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्टची बहीण शाहीनने आपण डिप्रेशनची बळी असल्याचं अनेकदा सांगितलंय. डिप्रेशनचा सामना तिने कसा केला याबाबतचं एक पुस्तकही लिहिलंय, ज्यात वैयक्तिक आयुष्याबाबतच्या अनेक गोष्टींचा तिने खुलासा केलाय. नुकतंच एका मुलाखतीत तिने सांगितलं, की तिच्या लूकमुळे तिला लहानपणी देखील अनेकदा भावनिक वेदनांना सामोरं जावं लागलंय.

शाहीन एकदा तिच्या दोन्ही बहिणी आलिया आणि पुजा भट्ट यांच्यासोबत फोटो काढत होती. पण फोटोग्राफरने शाहीनला फ्रेमच्या बाहेर जायला सांगितलं. आलिया आणि पुजा गोऱ्या आणि सुंदर दिसत होत्या. पण शाहीनचा चेहरा काळा-सावळा होता आणि ती मोठी दिसत होती. ते फोटो आजही पाहिले तर प्रचंड वाईट वाटतं, असं शाहीन एका मुलाखतीत म्हणाली.

शाहीनने तिच्या डिप्रेशनविषयी अनेकदा जाहीरपणे सांगितलंय. अनेकदा आत्महत्येचा विचार मनात आला होता आणि आत्महत्येचा प्रयत्न केल्याचाही खुलासा तिने केला होता. शाहीनचं पुस्तक लाँच झाल्यानंतर आणि सर्व गोष्टी समजल्यानंतर आलिया देखील इमोशनल झाली होती. यानंतर तिने तिच्या भावना व्यक्त करण्यासाठी इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली होती.

आलिया आणि शाहीन या सिनेनिर्माते महेश भट्ट यांच्या दुसऱ्या पत्नीच्या मुली आहेत. तर पुजा भट्ट ही महेश भट्ट यांच्या पहिल्या पत्नी किरण यांची मुलगी आहे.