पाच वर्ष झुंज, इमरान हाश्मीच्या मुलाने कॅन्सरशी लढाई जिंकली

मुंबई : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चिट इंडिया’ या सिनेमातून भारतातील शिक्षणपद्धतीतील फोलपणा दाखवणारा बॉलीवुडचा अभिनेता इमरान हाश्मीने त्याचा मुलगा कॅन्सरमधून बचावला असल्याचं जाहीर केलं. सोमवारी त्याने ट्विटरवर याबाबतचे ट्वीट करत याची माहिती दिली. इमरान हाश्मीचा मुलगा अयान हा मागील पाच वर्षांपासून कॅन्सर या आजाराने ग्रस्त होता. त्याला 2014 साली तीन वर्षांच्या वयात कीडनीचा दुर्मिळ कॅन्सर …

पाच वर्ष झुंज, इमरान हाश्मीच्या मुलाने कॅन्सरशी लढाई जिंकली

मुंबई : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चिट इंडिया’ या सिनेमातून भारतातील शिक्षणपद्धतीतील फोलपणा दाखवणारा बॉलीवुडचा अभिनेता इमरान हाश्मीने त्याचा मुलगा कॅन्सरमधून बचावला असल्याचं जाहीर केलं. सोमवारी त्याने ट्विटरवर याबाबतचे ट्वीट करत याची माहिती दिली. इमरान हाश्मीचा मुलगा अयान हा मागील पाच वर्षांपासून कॅन्सर या आजाराने ग्रस्त होता. त्याला 2014 साली तीन वर्षांच्या वयात कीडनीचा दुर्मिळ कॅन्सर झाला होता.

 

इमरानने अयानसोबतचे काही फोटो शेअर करत ट्वीट केले. “पाच वर्षांनंतर अयानला कॅन्सरमुक्त घोषित करण्यात आले आहे. हा एक लांब प्रवास होता. प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी तुम्हा सर्वांचे आभार”, असे इमरानने आपल्या ट्विटमध्ये लिहिले.


“कॅन्सर रोगाने ग्रस्त असलेल्या सर्व लोकांना माझं प्रेम आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना करील. आशा आणि विश्वास असू द्या, तुम्ही ही लढाई नक्की जिंकाल!”, असेही इमरानने आपल्या ट्विटमध्ये लिहिले.

इमरान हाश्मीने बिलाल सिद्दीकीसोबत ‘द किस ऑफ लाईफ, हाऊ अ सुपरहिरो अँड माय सन डिफीटेड कॅन्सर’ नावाच पुस्तकही लिहिलं. या पुस्तकात त्याने आपल्या मुलाच्या कॅन्सर संघर्षाबाबत सांगितले आहे. पाच वर्ष अयान कशाप्रकारे कॅन्सरशी लढला आणि जिंकला हे या पुस्तकातून सांगण्यात आले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *