अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात पोलिसात तक्रार

मुंबई : मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्याला शिवीगाळ करुन मारहाण केली, असा आरोप फॅशन डिझायनर जान्हवी मानचंदाने केला आहे. जान्हवी मानचंदा हिने मीरा रोड येथील काशीमीरा पोलिस ठाण्यात अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात तक्रारही दाखल केली आहे. फॅशन डिझायनरने प्राजक्ता माळीविरोधात मारहाण आणि शिवागाळीची तक्रार काशीमीरा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर, पोलिसांनी प्राजक्ता माळीविरोधात  कलम 232 […]

अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात पोलिसात तक्रार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

मुंबई : मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्याला शिवीगाळ करुन मारहाण केली, असा आरोप फॅशन डिझायनर जान्हवी मानचंदाने केला आहे. जान्हवी मानचंदा हिने मीरा रोड येथील काशीमीरा पोलिस ठाण्यात अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात तक्रारही दाखल केली आहे.

फॅशन डिझायनरने प्राजक्ता माळीविरोधात मारहाण आणि शिवागाळीची तक्रार काशीमीरा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर, पोलिसांनी प्राजक्ता माळीविरोधात  कलम 232 आणि कलम 504 अन्वये तक्रार दाखल करुन घेतली.

दरम्यान, या प्रकरणात अभिनेत्री प्राजक्ता माळी हिची बाजू अद्याप कळू शकली नाही.

कोण आहे प्राजक्ता माळी?

प्राजक्ता माळी मराठी सिनेमा, मालिका आणि नाटकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जुळून येती रेशीमगाठी, नकटीच्या लग्नाला यायाचं हं यांसारख्या मालिकांमधून प्राजक्ता माळी घराघरात पोहोचली. प्राजक्ताने मराठीतील अनेक सिनेमांमध्येही काम केले आहे. संघर्ष, खो खो, हम्पी, गोळाबेरीज, डॉ. काशीनाथ घाणेकर यांसह अनेक सिनेमात महत्त्वाची भूमिका प्राजक्ताने साकारली आहे. तसेच, निम्मा शिम्मा राक्षस, शिवपुत्र संभाजीराजे, प्लेझंट सरप्राईज अशा नाटकांमधूनही काम केले.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.