2.0 ची कोटींची उड्डाणं कायम, पाचव्या दिवसाची कमाई तब्बल...

मुंबई : देशातील बीग बजेट चित्रपट 2.0 नुकताच रिलीज झाला आहे. अक्षय कुमार आणि रजनीकांतच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलाय. चित्रपटाने पाचव्या दिवशीही कोटींची उड्डाणे कायम ठेवली. हिंदी भाषेतील चित्रपटाने अवघ्या पाच दिवसात 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने सोमवारीही बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई करत 13 कोटी रुपयांंचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाची एकूण कमाई …

मुंबई : देशातील बीग बजेट चित्रपट 2.0 नुकताच रिलीज झाला आहे. अक्षय कुमार आणि रजनीकांतच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलाय. चित्रपटाने पाचव्या दिवशीही कोटींची उड्डाणे कायम ठेवली. हिंदी भाषेतील चित्रपटाने अवघ्या पाच दिवसात 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने सोमवारीही बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई करत 13 कोटी रुपयांंचा गल्ला जमवला आहे.
चित्रपटाची एकूण कमाई पाहिली तर आतापर्यंत 111 कोटी रुपयांची कमाई केली. विशेष म्हणजे ही कमाई फक्त हिंदी भाषेतील चित्रपटाची आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने 20.25 कोटी रुपये कमावले होते. तर दुसऱ्या दिवशी 18 कोटी रुपयांची कमाई केली होती.
यानंतर चित्रपटाने तिसऱ्या दिवशी कमाईमध्ये झेप घेत 25 कोटी रुपयांची कमाई केली आणि रविवारी रेकॉर्ड ब्रेक कमाई करत 34 कोटी रुपयांचा आकडा गाठला होता. सोमवारी चित्रपटाने 13 कोटी कमावले या सर्व दिवसांचा विचार केला तर एकूण 111 कोटी रुपयांची कमाई केली.
चित्रपटाची वर्ल्डवाईड कमाई पाहिली तर, चार दिवसांच्या कमाईचा आकडा चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी शेअर केला होता. 2.0 च्या निर्मात्यांनी खुलासा केला की, त्यांच्या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर पहिल्या वीकेंडमध्ये 400 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
2.0 मध्ये रजनीकांत तीन वेग-वेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. तर अक्षय कुमारची भूमिका ही भयानक अशा लूकमध्ये आहे. अॅमी जॅक्सन, आदिल हुसैन आणि सुधांशू पांडे सारखे कलाकारांनीही प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. अक्षय कुमारचा हा पहिला दक्षिण चित्रपट आहे ज्यात तो एका खलनायकाच्या भूमिकेत आहे. 550 कोटी बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *