गुलाल, ब्लॅकफ्रायडे चित्रपटातला अभिनेता चौकीदाराचं काम करतोय

गुलाल, ब्लॅकफ्रायडे चित्रपटातला अभिनेता चौकीदाराचं काम करतोय

लखनऊ : बॉलिवूड म्हटलं की प्रत्येकाच्या नजरेसमोर ग्लॅमरस अभिनेते डोळ्यासमोर येतात. बॉलिवूड चित्रपट इंडस्ट्री बाहेरुन जशी दिसते तशीच आतून नाही. मोठे-मोठे सुपरस्टार इथे लाखो-कोटी रुपयांत कमाई करतात, तर काही असेही कलाकार आहेत जे कमी कमाई करतात. बॉलिवूडमधून अनेक कलाकार प्रसिद्ध झालेत मात्र परिस्थितीने त्यांच्यावर वाईट वेळही आली आहे. असाच बॉलिवूडमधील एक कलाकार आहे त्याने बॉलिवूडमधील अनेक मोठ्या चित्रपटात आणि कलाकारांसोबत काम केलं आहे. मात्र आज परिस्थितीमुळे तो एका सोसायटीत सिक्युरिटी गार्डचं काम करत आहे. त्रिलोचन सिंह सिद्धू असं या अभिनेत्याचं नाव आहे.

गुलाल, ब्लॅक फ्रायडे आणि पटियाला हाऊस सारख्या चित्रपटात त्रिलोचन सिंह सिद्धूने काम केलं आहे. आज सिद्धू सिक्युरिटी गार्डची नोकरी करत आपलं पोट भरत आहे. त्रिलोचन उर्फ सवी सिद्धूने सुपरस्टार अक्षय कुमार आणि अनुराग कश्यपसारख्या मोठ्या दिग्दर्शकासोबत काम केलं आहे. मात्र आज आर्थिक परिस्थितीमुळे त्याला सिक्युरिटी गार्डची नोकरी करावी लागत आहे.

सवी सिद्धूने एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं की, मुंबईत आल्यानंतर अनुराग कश्यपने सर्वात पहिले चित्रपट ‘पाच’मध्ये मला काम दिलं. मात्र हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. यानंतर त्यांनी मला ‘गुलाल’ आणि ‘पटियाला हाऊस’मध्ये काम दिलं.

सवी सिद्धू म्हणाला, एकवेळ अशी होती की माझ्याकडे खूप काम होते. यामुळे मला माझी नोकरी सोडावी लागली. मात्र वेळेसोबत माझी तब्येत बिघडली आणि मला काम मिळणं बंद झाले. यानंतर माझ्यावर आणखी संकट आले. माझ्या पत्नीचं निधन झाले आणि एका वर्षानंतर माझे वडील आणि सासू-सासऱ्यांचेही निधन झाले.

आर्थिक परिस्थिती बिघडत गेल्यामुळे मी आता एका हाऊसिंग सोसायटीमध्ये चौकीदाराची नोकरी करत आहे. सध्या मी दिग्दर्शक आणि निर्मात्यांनाही पैसे नसल्यामुळे भेटू शकत नाही. माझ्याकडे बसची तिकीट खरेदी करण्यासाठीही पैसे नाहीत. चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे माझ्यासाठी आता एक स्वप्न राहिलं आहे, असं सवी म्हणाला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *