अभिनेत्री मानसी नाईक छेडछाड प्रकरण, पुण्यात तंत्रज्ञाला अटक, दाम्पत्याला जामीन

पुण्याच्या युवासेना जिल्हाप्रमुखाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आपल्याशी गैरवर्तन झाल्याची तक्रार मानसी नाईकने दिली होती

अभिनेत्री मानसी नाईक छेडछाड प्रकरण, पुण्यात तंत्रज्ञाला अटक, दाम्पत्याला जामीन
Follow us
| Updated on: Feb 09, 2020 | 8:24 AM

मुंबई : अभिनेत्री मानसी नाईक छेडछाड प्रकरणी एका आरोपीला अटक (Manasi Naik Molestation Case Arrest) करण्यात आली आहे. साऊंड असिस्टंट अजय कल्याणकर याला पुण्यातील स्वारगेट भागातून बेड्या ठोकण्यात आल्या.

पुण्याच्या युवासेना जिल्हाप्रमुखाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आपल्याशी गैरवर्तन झाल्याची तक्रार मानसीने मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात दाखल केली होती. शिरुर तालुक्यातील रांजणगावात हा प्रकार घडल्याचा आरोप मानसीने केला होता.

मुंबईतील तक्रार रांजणगाव पोलिस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आली. त्यानंतर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी एक पथक तयार करुन आरोपीची धरपकड केली. शिरुर न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, मानसी नाईक छेडछाड प्रकरणी तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. डॉ. पोटे आणि त्यांच्या पत्नीने फोनवरुन आपल्याशी वाद घातल्याचं मानसीने सांगितलं होतं.

नेमकं काय घडलं?

मानसी नाईक पाच फेब्रुवारीला पुण्यातील शिरुर तालुक्यामधील रांजणगाव येथे संध्याकाळी एका कार्यक्रमासाठी गेली होती. पुण्याच्या युवासेना जिल्हा प्रमुखाच्या वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात परफॉर्मन्स करत असताना एका व्यक्तीने आपल्याशी गैरवर्तन केल्याचा दावा मानसीने केला. त्याने मंचाजवळ येऊन आपल्याला धमकवण्याचा प्रयत्न केल्याचंही मानसीने सांगितलं होतं.

या प्रकरणी तीन जणांविरोधात कलम 354 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त अंकित गोयल यांनी दिली होती. (Manasi Naik Molestation Case Arrest)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.