प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याच्या मुलीला 'कोरोना'

कोरोना'ग्रस्त तरुणीचे अहवाल काल पॉझिटिव्ह आले असून तिची प्रकृती स्थिर आहे. 31 वर्षीय तरुणीला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Film Producer Daughter Corona Positive)

प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याच्या मुलीला 'कोरोना'

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याच्या मुलीला ‘कोरोना’ची लागण झाली आहे. त्यामुळे बॉलिवूडही कोरोनाच्या उंबरठ्यावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Film Producer Daughter Corona Positive)

‘कोरोना’ग्रस्त तरुणीचे अहवाल काल पॉझिटिव्ह आले असून तिची प्रकृती स्थिर आहे. 31 वर्षीय तरुणीला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिच्यावर आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरु आहेत.

संबंधित तरुणीचे कुटुंब अंधेरीतील जुहू भागात राहतं. तिच्या कुटुंबियांचीही आता ‘कोरोना’ चाचणी केली जाणार आहे. बीएमसीकडून त्यांच्या घराचं निर्जंतुकीकरण केलं जाणार आहे.

दरम्यान, गायिका कनिका कपूरचा सहावा ‘कोरोना’ रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तिला लखनऊमधील खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कनिका लंडनवरुन परतल्यावर तिला कोरोनाची लागण झाली होती. (Film Producer Daughter Corona Positive)

अंकिता लोखंडेच्या सोसायटीमध्ये ‘कोरोना’ग्रस्त

हिंदी मनोरंजन विश्वात स्वतःचा ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्या सोसायटीमध्ये ‘कोरोना’ग्रस्त व्यक्ती आढळली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा भाग सील करण्यात आला आहे.

अंकिता ज्या कॉम्प्लेक्समध्ये राहते, तिथे राहणाऱ्या रहिवाशाची ‘कोरोना’ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे निर्जंतुकीकरण करण्यासाठी आता या संपूर्ण कॉम्प्लेक्सलाच सील ठोकण्यात आलं आहे. या कॉम्प्लेक्समध्ये अंकिताप्रमाणेच मिश्कत वर्मा, अशिता धवन, नताशा शर्मा हे टीव्ही कलाकारही राहतात.

हेही वाचा :  अंधेरीत एकाच कुटुंबातील 10 जणांना ‘कोरोना’, मुंबईतील दोन खासगी रुग्णालयात उपचार

कोरोनाचा संसर्ग झालेला व्यक्ती स्पेनवरुन परतली होती. भारतात आल्यानंतर विमानतळावर त्यांची कोरोनाची चाचणी केली असता अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र काही दिवसानंतर त्याला ‘कोरोना’ची लक्षणं जाणवू लागली.

‘माझ्या विंगमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सध्या तिला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे. मुंबई पोलिस आणि बीएमसीच्या सहकार्याबद्दल मनापासून आभार’ अशी प्रतिक्रिया अभिनेत्री अशिता धवनने दिली.

(Film Producer Daughter Corona Positive)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *